🔘 *_रविवारी सुट्टी का असते ? जाणून घ्या_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
_सध्या प्रत्येक कामगार-कर्मचारी हा रविवारच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघत असतो. रविवार आला की, सुट्टी एन्जॉय करण्यात गुंग होऊन जातो. मात्र, रविवारीच का सुट्टी असते याचा विचार कधी तुम्ही केलाय का? रविवारी सुट्टी का असते याचा विचार कुणीही करत नाही. पण रविवारी सुट्टी असण्याला एक मोठा इतिहास आहे. आणि रविवारी सुट्टी असण्याला कारणही महत्वाचं आहे. चला तर जाणून घेऊया रविवारी का सुट्टी असते._
*ब्रिटिश आणि ख्रिच्चन धर्म यांची परंपरा*
रविवारी सुट्टी का असते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं ब्रिटीश काळात जावं लागेल. कारण याचे मुळं त्या काळात दडली आहेत. ब्रिटिशांच्या काळात कामगारांना सातही दिवस काम करावे लागायचे. कामगारांना एकही दिवस सुट्टी मिळत नव्हती. ब्रिटीश लोक हे ख्रिश्चन होते.ख्रिश्चन धर्मात दर रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याची पद्धत आहे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जायचे.
*नारायण मेघाजी लोखंडे यांचा प्रस्ताव*
कामगारांच्या या समस्येला तेव्हा वाचा फोडली ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी. ते तेव्हा कामगारांचे मोठे नेते होते. कामगारांनाही एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी स्पष्ट असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी ६ दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी आणि काही सामाजिक कामे कऱण्यासाठी मिळावा. तसेच रविवार खंडोबा या देवाचा हा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी.
*मोठा संघर्ष आणि १० जून १८९० रोजी सुट्टीची घोषणा*
ब्रिटीशांनी त्यांची ही मागणी नाकारली. मात्र, त्यानंतरही लोखंडे यांनी ही मागणी सतत केली. अखेर सात वर्षांच्या मोठ्य़ा संघर्षानंतर १० जून १८९० रोजी रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून आजतायगत रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे. तेव्हाची ही रविवारची सुट्टी आजही सर्व कामगार, कर्मचा-यांना मिळते. आज या रविवारच्या सुट्टीला फार महत्व आलं आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻