manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

फोन आल्यावर आपण Hello का म्हणतो

*_फोन आल्यावर आपण Hello का म्हणतो_*



_मोबाईल फोन आणि टेलिफोन आपण सर्वचजण वापरतो. फोन आल्यानंतर आपल्या तोंडातून सर्वात आधी उच्चारला जाणारा शब्द म्हणजे ‘हॅल्लो’. फोनचा वापर करण्यापूर्वी आपणही इतरांना फोनवर हॅल्लो बोलताना पाहिलेलं किंवा ऐकलेलं असतं त्यामुळे अनेकांनी फोन आल्यावर हॅल्लो या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, फोन रिसिव्ह झाल्यावर किंवा केल्यावर ‘हॅल्लो’ का म्हणतात? माहिती नाहीये ना?तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागचं खरं कारण…_

*हॅलो शब्द कसा तयार झाला?*
फोन रिसिव्ह केल्यानंतर ‘हॅल्लो’ बोलण्यामागे एक रोमांचक इतिहास आहे. याबाबत कदाचितच कुणाला माहिती असेल. हॅल्लो हा शब्द जर्मन शब्द ‘होला’ पासून बनला आहे. ‘होला’ या शब्दाचा अर्थ आहे ‘कसे आहात’. १३ व्या शतकानंतर हा शब्द हालो (Hallow) बनला. यानंतर २०० वर्षांनी हा शब्द हालू (Halloo) बनला.

*यामागे आहे रोमांचक इतिहास*
१८७६ मध्ये टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला आणि सर्वात आधी Hello हा शब्द बोलले होते. ग्रॅहम बेल यांची गर्लफ्रेंडचं नाव मारग्रेट हैलो असे होते. सर्वात आधी त्यांनी एक-सारखे दोन फोन्स बनविले. यापैकी एक फोन आपली गर्लफ्रेंडला दिला. यानंतर ग्रॅहम बेल यांनी तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर सर्वात आधी आपल्या गर्लफ्रेंडला फोन केला आणि प्रेमाने ‘हैलो’ असे म्हटले.यानंतर ज्यावेळी ते आपल्या गर्लफ्रेंडला फोन करत होते त्यावेळी ते ‘Hello’ बोलत असतं. यामुळे तेव्हापासून सर्वांनी ‘Hello’ या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याकाळात टेलिफोन एक्सचेंजमध्ये काम करणा-या महिला ऑपरेटर्सला ‘हॅल्लो गर्ल्स’ असे म्हटले जात असे.