manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Friday, June 12, 2020

लोकमान्य टिळक


               *लोकमान्य टिळक *
    

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
जन्म: जुलै २३,इ.स. १८५६
रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू: ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन:केसरी मराठा
पुरस्कार:लोकमान्य,
भारतीय असंतोषाचे जनक .
प्रमुख स्मारके:मुंबई दिल्ली इ
धर्म:हिंदू
प्रभाव:शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित:महात्मा गांधी, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर
वडील:गंगाधर रामचंद्र टिळक
आई:पार्वतीबाई टिळक
पत्नी:सत्यभामाबाई
अपत्ये:श्रीधर बळवंत टिळक
तळटिपा:
"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "
आज 1 ऑगस्ट 2018, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी . ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते.
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक.   त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले.टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
एकदा शाळेत असताना, वर्गात मुलांनी शेंगांची टरफले टाकली. गुरुजी वर्गात आल्या नंतर त्यांनी हे पाहिले आणि टिळकांना विचारले, हि टरफले कोणी टाकली ते सांग. त्यावर टिळक म्हणाले, मी चहाडी करणार नाही. गुरुजींनी शिक्षा म्हणून त्यांना ती टरफले उचलण्यास सांगितली. त्यावर टिळक उत्तरले मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. एकदा वर्गात गुरुजींनी संत हा शब्द लिहावयास सांगितला. टिळकांनी तो शब्द तीन प्रकारे लिहिला संत, सन्त, सनत. गुरुजींनी त्यातला पहिला शब्द बरोबर देऊन बाकीचे दोन चूक दिले. त्यावर टिळकांनी गुरुजींनासर्व शब्द कसे बरोबर आहेत ते सांगितले.
टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले.पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली.
असं हे बहुमूल्य रत्न, मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना माझे शतशः प्रणाम. जय हिंद ! जय महाराष्ट्र !