manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Tuesday, June 30, 2020

संत एकनाथ


                                संत एकनाथ

                  


  जन्म तारीख इ.स. १५३३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान)महाराष्ट्र 
मृत्यू तारीखइ.स. १५९९

   जीवन
                सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.
                एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
              कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची अरती घणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
                   फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

गुरुपरंपरा
*एकनाथांची गुरुपरंपरा :
*नारायण (विष्णू)
*ब्रह्मदेव
*अत्री ऋषी
*दत्तात्रेय
*जनार्दनस्वामी
*एकनाथ

एकनाथांचे कार्य व लेखन
*अनुभवानंद
*आनंदलहरी
*एकनाथी अभंग गाथा
*चिरंजीवपद
*एकनाथी भागवत : भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
चतु:श्लोकी भागवत मुद्राविलास
*भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
*भावार्थ रामायण : (एकनाथी ओवीबद्ध मराठी, रॉयल ऑक्टेव्ह साईज - निर्णयसागर शताब्दि प्रकाशन. (मूळ - *एकनाथ महाराज/संपादक - शं.भा. देवस्थळी, कृ.वि. सोमण)
*रुक्मिणीस्वयंवर
*लघुगीता
*शुकाष्टक टीका
*समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.
*स्वात्मबोध
*संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ - एकूण २५ अभंग
*हस्तमालक टीका
*ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या *शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.

एकनाथांवरील मराठी पुस्तके
*संत एकनाथ (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
*संत एकनाथ (विजय यंगलवार)
*संत एकनाथ (विनायक मुरकुटे)
*श्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर)
*संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)
*एकनाथ गाथा (संपादक - साखरे महाराज (नानामाहाराज साखरे))
*एकनाथ चरित्र (ल.रा. पांगारकर)
*संत एकनाथ दर्शन (ललित लेखसंग्रह, लेखक -हे.वि. इनामदार)
*संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
*एकनाथांची निवडक भारुडे (डॉ. वसंत जोशी)
*एकनाथी भागवत सार्थ (सदाशिव आठवले)
*एकनाथी भागवत (शोधून, विपुल व सुबोध टीपा आणि अल्पचरित्र यांसह लिहिलेला ग्रंथ, लेखक/संपादक गोविंद नारायण शास्त्री दातार)
*एकनाथी भागवताचा अभ्यास (दा.वि. कुलकर्णी)
*एका जनार्दनी (एकनाथांवरील दीर्घ कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे)
*एका जनार्दनी (डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. वि.रा. करंदीकर
*एका जनार्दनी ! (कादंबरी, लेखक - रवींद्र भट
*एका जनार्दनी (बालसाहित्य, लेखिका - लीला गोळे)
*एकोबा (एकनाथांचे चरित्र, लेखिला - डॉ. कुमुद गोसावी)
*भागवतोत्तम संत एकनाथ (डाॅ. शं. दा. पेंडसे)
*लोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)