manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Saturday, May 16, 2020

किल्ल्याविषयी काही महत्वपूर्ण संकल्पना

किल्ल्याविषयी  काही महत्वपूर्ण संकल्पना


1. घेरा- किल्ल्याच्या परिघात असणारा प्रदेश
2. मेट- डोंगरउतारावरच्या सोंडावर डोंगराच्या मध्यभागी कायमस्वरूपी घरे बांधून तिथे पहारेकरी तैनात केले जात त्या चौकिनाक्याला मेट म्हणत
3. अर किल्ला/अरक किल्ला- भुईकोटामधे असणारा आतील छोट्या आकाराचा किल्ला
4. लादनी- तटबंदीवरुण गस्त घालण्यासाठी/चालत जाण्यासाठी फाँजीच्या कटकोणात असलेला फरसबंदी मार्ग
5. अगळा- दुर्गाच्या दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूस कड़ीसारखे आडवे घाटलेले लांब रुंद लाकुड़ किंवा एखाद्या झाडाचे खोड
6. जिभि- दरवाजाच्या बाहेरून दुर्गाच्या आत काय चालले आहे ते दिसू नये म्हणून दरवाजासमोर काही अंतरावर बांधलेली संरक्षनात्मक भिंत
7. रेवनि- खंदक आणि उंचवटा यांच्या दरम्यान असलेल्या सपाटिच्या भागाला आणि उंचवट्याला रेवनि किंवा रेवण म्हणत
8.अलंगा- दुर्गावर तैनात केलेल्या सैन्यासाठी/लोकांसाठी बांधलेल्या झोपडीवजा घराना अलंगा म्हणतात
9. रणमंडल- भुदुर्गात मुख्य प्रवेशद्वार भक्कम बांधनीच्या दोन बुरुजामधे बांधलेले असते आणि तो दरवाजा बाहेरून तोफा बंदुकाच्या माऱ्यात येऊ नये म्हणून संरक्षनासाठी आडोसा देनारे तट बुरुजांचे बांधकाम
10. इटा- बांधकामासाठी वापरन्याच्या वीटा
11. इळा- विळा
12. खासबाग- क्रिडेसाठी निर्माण केलेली बाग़
13. खंबीर- बांधकामासाठी वापरन्याचा घाणित मळलेला चुना
14. गडकोंन- गडाच्या अरणीवरुण पुढे डोकावणाऱ्या प्रचंड शिळा
15.गोंडा- भिंत बांधनारा कारागिर
16. घाटगस्ती- नियमित वेळेवर चालणारा फिरता पहारा
17. चिरे- बांधकामासाठी सर्व बाजुनि तासुन घडविलेले दगड
18. दिवानवाडा- राजाचा गडावरील वाडा
19. धबधबा- गडांच्या डोंगरावरील पाणलोट
20. पनाळि- पाणी वाहून नेण्यासाठी केलेली खोलगट वाट
21. बालंगरेज- छपराच्या पुढे आलेला भाग व भिंत यामधील जागा किवा वळचन
22. बेलदार- दगड तासनारा कारागिर
23. बंक- ओसरी
24. मगर्बिवी- दगड फेकन्याचे यंत्र
25. ईस्तादेची घरे- चुण्याचे पक्के बांधकाम असलेली घरे
26. चरक्या- बाण
27. भांडे निववायच्या कुंच्या- तोफेतून बार उडऊन झाल्यावर तिचे तापमान कमी कमी करत थंड करण्यासाठी तयार केलेली खोळ
28. कीट- जळके लोखंड
29. रेजगिरि- तोफा बंदुकामधून उडविण्यात येणारे धातुचे तुकडे हे बहुतेक शिशाचे असत
30. जामग्या- तोफा/बंदुकामधील दारुला बत्ती देण्यासाठी वापरलेली वात/तोडा/काकडा हा सुतळीचा असे
31. काने- तोफा बंदुकामधे ठासलेल्या दारुला शीलगावन्यासाठी केलेले छिद्र
32. सामते- छिद्र पाडण्याचे यंत्र
33. उपराळा- कुमक किंवा गडोपोयगी कोणत्याही प्रकाराची मदत
34. माळा- जंगलातल्या वेलींच्या मध्यम विनीच्या एक प्रकारच्या शिड्या
35. नारळ- कमी वजनाच्या तोफा
36. वोघ- पाण्याचा स्त्रोत/झरा