manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, November 25, 2020

संविधान दिन

 

                               
   *26 नोव्हेंबर - संविधान दिन*
        *भारताचे संविधान*
*भारतातील सर्वोच्च कायदा*

*भारतीय संविधान उद्देशिका*

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

📜 *इतिहास*

भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्या पैंकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्या पैंकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जाने, इ.स. १९४७)

१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर  १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर  १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

📖 *स्वरूप*

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ३९५ (डिसेंम्बर २०१८) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.

📒 *तोंडओळख व महत्त्वाची अंगे*

भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४ व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थे प्रमाणे भारतीय संसदही द्विगृही (Bicameral) आहे.

📖 *उद्देशिका*

मुख्य पान: भारतीय संविधान उद्देशिका
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे. उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय
आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य
आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते.
मूळ उद्देशिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

🗳 *मूलभूत अधिकार*

भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचारा विरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत.

स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)
कायदा (कलम २०), जीविताचा अधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदेचे स्वातंत्र्य (कलम २२)
शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण
धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य
अल्पसंख्याकांचे अधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य
घटनात्मक तक्रारींचा अधिकार (कलम ३२-३५): मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.
मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती.

📘 *सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे*

राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदे/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन (Judiciary) व प्रशासकीय (Executive) अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४०) मध्ये उल्लेख आहे.

निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ (Vague) असे आहे. वरील पैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्विक मूल्ये (Moral values) असेच त्याचे स्वरूप आहे.

📙 *सत्ता*

सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे -

कार्यकारी (Executive)
कायदेकारी(Legislative)
न्यायालयीन (Judicial)
प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते.

भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही(Unicameral) वा द्विगृही(Bicameral) असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह (Lower House) तर विधानपरिषद हे वरील सभागृह(Upper House) असते.

📔 *संघराज्य प्रणाली*

भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला.

📗 *अधिकृत भाषा*

संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे.

कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते

📙 *आणीबाणीविषयक तरतुदी*

भारताच्या राज्यघटनेत आणीबाणी विषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यात -

राष्ट्रीय आणीबाणी - जेव्हा राष्ट्र वा त्याचा मोठा हिस्सा आपदकालीन स्थितीत असतो तेव्हा
प्रादेशिक आणीबाणी - जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा
आर्थिक आणीबाणी - जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य वा पत धोक्यात असते तेव्हा
अशा तीन आणीबाणींचा समावेश आहे

राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकता. ३५३ व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकटवितात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात.

📗 *कलमांचा गोषवारा*

संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -

भाग १ -
कलम 1 संघाचे नाव आणि भूप्रदेश
कलम 2 - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती
कलम 2(अ)-सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)

कलम 3- नवीन राज्याची स्थापना, सिमा किंवा नावे बदलणे
कलम 4-कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत केलेले बदल, कलम368 अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही
भाग 2 - कलमे 5-11नागरिकत्व
भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क
कलमे १४-१८ समानतेचा हक्क,
कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,
कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,
कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,
कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,
कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.
भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलमे ३६ - ५१
कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन
कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार
भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.
*भाग ५ -*
प्रकरण १ - कलमे ५२-७८
कलमे ५२-६३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,
कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक
कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,
कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत
प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.
कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,
कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,
कलमे ९९-१००
कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,
कलमे १०७-१११ (law making process)
कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,
कलमे ११८-१२२
प्रकरण ३ - कलम १२३
कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत
प्रकरण ४ - कलमे १२४-१४७
कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत
प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.
कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत
भाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.
प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या
कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून
प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत
कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,
कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,
कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.
कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.
प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.
कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती
कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार
कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी
कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे
कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी
कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी
कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी
प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत
कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.
प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.
कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.
प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.
कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत

📓 *भाग ७ - राज्यांच्या बाबतीतील कलमे.*

कलम २३८ -
भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे
कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत
भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे
कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत
भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.
कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत
भाग १० -
कलमे २४४ - २४४
भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी
प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी
कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी
प्रकरण २ - कलमे २५६ - २६३
कलमे २५६ - २६१ - सामान्य
कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.
कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.
भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत
प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत
कलमे २६४ - २६७ सामान्य
कलमे २६८ - २८१
कलमे २८२ - २९१ इतर
प्रकरण २ - कलमे २९२ - २९३
कलमे २९२ - २९३
प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००
कलमे २९४ - ३००
प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक
कलम ३०० अ -
भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे
कलमे ३०१ - ३०५
कलम ३०६ -
कलम ३०७ -
भाग १४ -
प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४
कलमे ३०८ - ३१३
कलम ३१४ -
प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
भाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमे
कलमे ३२३ अ - ३२३ बी
भाग १५ - निवडणूक विषयक कलमे
कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे
कलम ३२९ अ -
भाग १६ -
कलमे ३३० -३४२
भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे
प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत
कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत
प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत
कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत
प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश
कलम ३५० -
कलम ३५० अ -
कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम
कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलम
भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
कलम ३५९ अ -
कलम ३६० - आर्थिक आणीबाणी
भाग १९ - इतर विषय
कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय
कलम ३६२ -
कलमे ३६३ - ३६७ - इतर
भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत
कलम ३६८ -घटनादुरुस्ती
भाग २१ -
कलमे ३६९ -३७८
कलमे ३७९ - ३९१ -
कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क
भाग २२ -
कलमे ३९३ -३९५

📝 *घटनादुरुस्त्या*

मुख्य पान: भारतीय संविधानातील दुरुस्त्या
राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते.
        🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳