manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

आपला मेंदू किती GB चा आहे?

आपला मेंदू किती GB चा आहे?

मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट.

१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट.
१ टेरा बाईट १००० जीबी.

म्हणजे १६ जीबी ची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होती, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे.

मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतीलआपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात.

आकाशगंगेत असणार्‍या तार्‍यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील!

एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण, न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत.

मग आहात ना तुम्ही स्मार्ट!!!