manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा


*🔹भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा*
मेट्रिक पध्दती
*अॅम्पिअर* :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.
*बार* :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
*कॅलरी* :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. मे वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.
*ओहम* :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर
*अश्चशक्ती* :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.
*ज्यूल* :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलतून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.
*व्होल्ट* :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.
*वॅट* :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.
*नॉट* :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.
*सौर-दिन* :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कलावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.
*प्रकाश वर्ष*:- प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3x10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46x10)12 किमी
*विस्थापन* :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.
*गती/चाल* :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.
*वेग* :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.
*त्वरण* :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.
*संवेग* :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग
*कार्य* :- वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या सेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर
*ऊर्जा* :- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.
*स्थितीज ऊर्जा* :- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते. PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे गुरुत्वाकर्षनीय प्रवेग, =h म्हणजे पदार्थाची उंची.
*गतीज ऊर्जा* :- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात. KE=1/2 mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा, m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते.
*शक्ती*:- एक प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्‍या प्रकारच्या उर्जामध्ये रूपांतरित झाल्यामुळे जे कार्य घडते त्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. CGS पद्धतीत कार्य शक्तीचे एकक वॅट आहे. दर सेकंदास एक ज्यूल कार्य करण्यास आवश्यक असणार्‍या शक्तीला एक वॅट शक्ती असे म्हणतात. MKS पद्धतीत शक्तीचे एकक किलोवॅट आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या यांत्रिक उपकरणात शक्तीचे एकक हॉर्स पॉवर वापरतात. हॉर्स पॉवर याचा अर्थ एका घोडयाची शक्ती होय. हॉर्स पॉवर = 746 वॅट.