manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

इंग्रजी महिन्यांची नावे कशी पडली ?जाणून घ्या

*_इंग्रजी महिन्यांची नावे कशी पडली ?जाणून घ्या_*


_सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण २०१८च्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. हे नवे वर्ष इंग्रजी कालगणनेनुसार सुरू झाले असून संपूर्ण जगाने आज ’ग्रेगरियन’ कालगणना स्‍वीकारली आहे. हे कॅलेंडर पोप ग्रेगरी (तेरावे) यांनी प्रचारात आणल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ याला ग्रेगारियन कॅलेंडर असे नाव देण्यात आले. पण या कॅलेंडरमधील महिन्यांची नावे कशी पडली याबद्दलची ही माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत._

◆‘जॅनरियुस’ या लॅटीन भाषेतील शब्दापासून जानेवारी हा शब्द तयार झाला. ‘जॅनरियुस’ हे नाव ‘जानूस’ किंवा ’जेनस’ या रोमन देवाच्या आधारे पडले. पोटासमोर आणि पाठीमागे अशी दोन तोंडे या देवाला असल्याची अख्यायिका असल्यामुळे हा देव एकाच वेळी मागे आणि पुढे पाहू शकतो. जानेवारी महिन्याचेही असेच आहे. जानेवारीमध्ये मागील वर्षाला विसरले जात नाही आणि नवीन वर्षाचे स्‍वागत केले जाते.

◆’फेब्रुवारी’ असा ‘फॅबीएरियुस’ हा लॅटीन शब्‍दाचा अपभ्रंश झाला. ‘फेब्रू’ आणि ‘अरी’ हा त्याचा मूळ धातू असून त्याचा अर्थ शुद्ध करणे असा होतो. हा महिना प्राचीन रोमन संस्‍कृतीमध्ये आत्मशुद्धी आणि प्रायश्चित करण्यासाठी मह्त्वाचा मानला जात असल्यामुळे त्याला फेब्रुवारी असे नाव दिले गेले.

◆’मार्च’ महिन्याचे नाव रोमन देवता ‘मार्टियुस’ (मार्स) याच्या नावावर पडले. युद्ध आणि समृद्धीचा हा देव आहे.या महिन्याच्या २३ तारखेला सूर्य आकाशाच्या मधोमध तळपतो.या दिवशी दिवस आणि रात्र समान वेळेचे असतात.

◆’एप्रिल’ हा शब्द ‘एप्रिलिस’ या शब्दांपासून तयार झाला. लॅटिन भाषेतील ‘एप्रिल्ज’ या शब्दाचा एप्रिलिस हा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ उद्घाटन करणे, उघडणे, फुटणे असा आहे. युरोपात या महिन्यामध्ये वसंताचे आगमन असल्यामुळे या महिन्याचे नाव ‘एप्रिलिस’ असे ठेवले गेले. त्याला कालांतराने ‘एप्रिल’ असे म्हटले जाऊ लागले.

◆’मे’ शब्द ‘मेइयुस’ या लॅटिन शब्दापासून तयार झाला. वसंतदेवी ’मेयस’च्या नावावरून हे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.

◆‘जुनियुस’ शब्दाचा जून हा अपभ्रंश आहे. या महिन्याला हे नाव रोमची प्रमुख देवी ‘जूनो’ हिच्या नावावरून दिले गेले. रोमन देवराज जीयस याची ‘जूनो’ ही पत्नी आहे. ‘जुबेनियस’ या शब्दापासून जूनो शब्द तयार झाला. त्याचा अर्थ ‘विवाह योग्य कन्या’ असा होतो.

◆जुलै महिन्याचे नाव रोमन सम्राट जूलियस सीजर याच्या नावावरून पडले. जूलियस सीजरचा याच महिन्यात जन्म झाला होता. या महिन्याचे नाव त्याच्या जन्मापूर्वी ‘क्वाटिलिस’ असे होते.

◆ऑगस्ट या महिन्याचे नाव जूलियस सीजरचा पुतण्या आगस्टस सीजर याने आपल्या नावावर ठेवले. या महिन्याचे यापूर्वी नाव ‘सॅबिस्टलिस’ असे होते.

◆‘सप्टाम’ शब्‍दावर आधारित असलेल्या सप्टेंबरचा अर्थ ’७’ असा होतो. ‘सप्टेबर’ महिन्याला प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये सातवे स्‍थान होते. पण त्यात सुधारणा होऊन आता हा वर्षातील नववा महिना आहे.

◆ऑक्टोबर या महिन्याला प्राचिन रोमन कॅलेंडरमध्ये आठवे स्‍थान होते. मात्र, हा आता दहावा महिना आहे. याचा अर्थ ’८’ असा होतो.

◆‘नोव्हेबर’ हे नाव ‘नोवज’ या लॅटिन शब्दावरून पडले. याचा अर्थ ’९’ असा होतो. हा प्राचिन रोमन कॅलेंडरमध्ये नववा महिना होता.

◆‘डेसेंबर’ (डिसेंबर) हा शब्द लॅटिन शब्द ‘डेसेम’ पासून तयार झाला. याचा अर्थ १० असा होतो. हा प्राचीन रोमन कॅलेंडरमधील दहावा महिना होता. आता वर्षाचा शेवटचा आणि बारावा महिना आहे.