manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

या पाच देशांत मावळतच नाही सूर्य

👉 *_या पाच देशांत मावळतच नाही सूर्य_* 🌞🌞

किमान २४ तास पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी लागतो. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. आपण या ३६५ दिवसांच्या कालावधीला एक वर्ष म्हणतो.

पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि ती याच स्थितीत स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.

सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. सूर्याभोवती पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते.

_पण याला जगातील ५ देश अपवाद ठरले असून ३ ते ४ महिने सूर्य यातील काही देशांत मावळतच नाही_

1. कॅनडामधील लोकांना रात्र होण्याची दोन महिने वाट पहावी लागते, या देशात ५० दिवसाहून अधिक कालावधी सूर्य मावळण्यास लागतो.

2. नॉर्वे या देशात मे ते जुलै म्हणजेच ७६ दिवस सूर्य मावळत नाही, त्यामुळेच या देशाला लँड ऑफ द मिडनाईट सन असेही म्हटले जाते.

3. स्वीडन या देशात मे पासून ऑगस्ट या कालावधीत सूर्य अर्ध्या रात्री मावळतो आणि सकाळी ४.३० वाजता पुन्हा उगवतो, येथे तुम्ही अर्ध्या रात्री ही सूर्य किरणांचा आस्वाद घेऊ शकता.

4. आइसलँड हा उत्तर युरोपातील अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप देश असून येथे मे ते जून या महिन्यादरम्यान दिवसच असतो.

5. फिनलंड येथे देखील ७३ दिवसच सूर्य प्रकाशित असतो. येथील ७३ दिवस हे अविस्मरणीय असतात, ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

👉👉 *_हा देश करणार सर्वप्रथम नववर्षाचे स्वागत_* 💥💥

जगातील प्रत्येक देशात सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी असून तिथे त्यानुसार सरत्या वर्षाला अलविदा देऊन नववर्षाचे स्वागत केले जाते.

प्रत्येक देशाची वेळ पृथ्वीच्या प्रदक्षिणासोबत ठरवली जात असल्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री सगळ्यात आधी कोणता देश नवीन वर्षाचे स्वागत करेल याची उत्सुकता आहे

भारतीय वेळेनुसार आपल्या घड्याळात जेव्हा सायंकाळचे ४.३० वाजतील तेव्हा रात्रीचे १२ तोंगा या देशात वाजलेले असतील.

म्हणजेच तोंगा या शहरात जगात सगळ्यात आधी नववर्षाचे स्वागत केली जाईल. हा ओशनिया प्रांतातील एक छोटासा देश असून त्याचबरोबर सामोआ, ख्रिसमस आइसलँड या देशात सर्वप्रथम नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येईल.

त्यानंतर आपल्याकडे सायंकाळचे ४.४५ वाजलेले असतील तेव्हा न्यूझीलंडमध्ये नववर्षांचे स्वागत करण्यात येईल, त्यानंतर आजूबाजूच्या देशात रात्र संपून नववर्षाच्या स्वागताला उधाण येईल.

नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार असे देश आपल्या देशाच्या आजूबाजूला आहेत. आपल्या प्रमाणवेळेनुसार हे देश थोडेसे मागेपुढे आहेत. आपल्याकडे जेव्हा ११.३० वाजलेले असतील तेव्हा बांग्लादेशात नववर्षाची धूम सुरू होईल. त्यानंतर पावणेबाराच्या दरम्यान नेपाळमध्ये आणि त्यानंतर आपल्या देशात नववर्षाचे जंगी स्वागत करण्यात येईल
--------------------------------