*अश्रू म्हणजे काय?* :
आपला मानवी डोळा हा अनेक ग्रंथींपासून बनला आहे. त्यात मुख्य एक ग्रंथी म्हणजे अश्रूग्रंथी. अश्रूग्रंथी मध्ये पाण्यासारखा दिसणारा द्रव पदार्थ जो आपल्या डोळ्यावाटे बाहेर पडतो त्याला आपण अश्रू म्हणतो.
*अश्रुंचे प्रकार* :
*अश्रुंचे साधारणपणे ३(तीन) प्रकार पडतात* -
१) *मुलभूत अश्रू (Basal Tears)* : जेव्हा आपण एखाद्या धुळीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्या डोळ्यांतून आपोआप पाणी बाहेर पडते, त्या अश्रूंना 'मुलभूत अश्रू' म्हणतात. या अश्रुंचे मुख्य काम आहे आपल्या डोळ्यांचे धुळीपासून व अन्य घातक घटकांपासून रक्षण करणे व डोळ्यात धूळ न साचू देता तिला पाण्यावाटे बाहेर काढणे.
२) *प्रतीक्षेप अश्रू (Reflex Tears)* : हे अश्रू आपल्या मज्जातंतुंशी निगडीत असतात. उदा. जेव्हा आपण कांदा चिरत असतो, जेव्हा आपल्याला उलटी होत असते, एखादा पदार्थ आपल्या तोंडाला अतिगरम किंवा तिखट लागतो त्यावेळी डोळ्यातून येणारे पाणी म्हणजे प्रतीक्षेप अश्रू असतात. डोळ्याला त्रासदायक असणाऱ्या गोष्टींना दूर ठेवण्याचे काम हे अश्रू करतात.
३) *मानसिक अश्रू* : आपल्याला जेव्हा जास्त आनंद होतो, दुःख होते, मानसिक तणावात असतो त्यावेळी डोळ्यातू येणारे पाणी म्हणजे मानसिक अश्रू होय. आपल्या भावना या आपल्या मेंदु बरोबरच हार्मोन्सशी निगडीत असतात, म्हणून आपण जेव्हा भावनिकदृष्ट्या सक्रीय होतो तेव्हा आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे अश्रू आपल्या भावना व्यक्त करण्यासठी मेंदूद्वारे व डोळ्यात असलेल्या अश्रूग्रंथींद्वारे मदत करतात.