manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Thursday, September 10, 2020

ज्ञानरचनावाद प्रक्रीया उपक्रम

 

शैक्षणिक उपक्रम

 

🎋 ज्ञानरचनावाद प्रक्रीया उपक्रम🎋

♻♻♻♻♻♻♻♻♻♻


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

मुलांना  नेहमी अनेक प्रश्न पडत असतात त्या प्रश्नाना उत्तरे मिळवीत  असे मुलांना वाटत राहते यासाठी मुलाना पडणारे वेगवेगळे प्रश्न मुलांनी  कागदावर लिहुन वर्गातील पेटीत टाकावे आणि दर शनिवारी दुसऱ्या  तासाला प्रश्न तुमचे उत्तर माझे या उपक्रमात कुतुहल पेटी तील प्रश्नाची उत्तरे देता येतील काही प्रश्नाची उत्तरे गुगलच्या माध्यमातुनही देता येतील आणि मुलाची जिज्ञासा वाढीस लागेल.

              वाचणकट्टा

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

झाडाखाली,मैदानार, एका ओट्यावर ग्रंथालयातील काही पुस्तके दररोज लांब बाकांवर मांडली जातात. मधल्या सुट्टीत किंवा लहान सुट्टीच्या वेळेत विद्यार्थी इतरत्र न भटकता किंवा दंगामस्ती न करता वाचनकट्ट्यावर त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन होते आणि वेळेचा, जागेचा सदुपयोग होतो. वाचनकट्ट्यावर मांडलेली पुस्तके पाहून रस्त्यावरुन येणारे जाणारे ग्रामस्थही थबकतात आणि काही वेळ ती पुस्तके चाळतात. दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवली जाते. त्यादिवशी तासिकेप्रमाणे प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास दिली जातात. वाचलेल्या पुस्तकातील मजकुरावरुन विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करण्यास सांगितले जाते. एका दिवशी एकच प्रश्नवाचक शब्द दिला जातो. उदा. का, कधी, कसे, काय, कोण, कोठे इ... त्या एकाच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार करायचे. तयार केलेल्या प्रश्नांचे संकलन करुन प्रश्नपेढी तयार केली जाते. पुढील आठवड्यासाठी तोच प्रश्नवाचक शब्द देऊन आणखी प्रश्नांची भर घातली जाते.

🌻🌻 स्मरण खेळ 😇😇

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो.

हा खेळ घेताना टेबलावर ३५४० लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा.रूमाल,कंगवा ,खडू मोबाईल , पेन ,रबर, पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात.

मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.

नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात.

नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या.

त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.

जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.

🌻🌻ओंजळीने ग्लास भरणे 🌻🌻

मुलांना या खेळात फार आनंद मिळतो.

प्रथम आपण ६८ मुलांचे गट करावेत.

नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे.

त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.

मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल.

ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लासभरावा लागेल.

या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.

यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल.

🌻🌻ठराविक वेळेत गणिते सोडवणे 🌻🌻

मुलांना आपण १५२० बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची १५-२०लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ६७मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो.

 त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे.

सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे.

 अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.

या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.

🌻🌻एकमेकांना हसवणे 😝🌻🌻

मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा.

काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकी एकाने येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा.

मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही.

वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे.

जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.

🌻🌻आवाज ओळखणे 🌻🌻

एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे.

त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे .

जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा .

असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा .

ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.

🌻🌻मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा.

मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल

🌻वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस

 

🌻 परिचयाच्या चित्रांचा वापर करु खेळ घेणे.🌻

सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा.चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.

पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.

पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

🌻दहा शब्द झाले की वाक्यवाचन सुरु करावे.हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे.नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.

दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.

🌻अक्षरपरिचय करून  घ्यावा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा.आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा.आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.

गृहपाठ = वर्तमानपत्रातील कात्रण  कापुन आणणे.

    अक्षरदृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेण.

काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कालमापन हा घटक शिकवला.उपक्रम म्हणून विद्यार्थांना घड्याळाची प्रतिकृति बनवून आणायला सांगितली होती.बऱ्याच मुलांनी बनवून ही आणली.वर्गातील घडयाळाच्या मदतीने किती वाजले? याचा सराव घेतला .त्यानंतर काही कामानिमित्त ऑफिस मधे गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर काय प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घड्याळातील काटे फिरवुन किती वाजले ? याचा सराव करत होती.ज्ञानरचनावादानुसार करत असलेल्या अध्ययनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.काही वेळा काटे तूटायचे कागदाचे नवीन काटे बनवून त्यांचा सराव (सराव म्हणण्यापेक्षा खेळच )बराच वेळ चालू होता.त्यादिवसापासून मात्र दररोज विद्यार्थी विचारायला लागली की सर घड्याळ घड्याळ खेळावं का.

📚📚📚📚📚📚📚📚📚

🏈🏈स्वरचिन्हपरिचय🏈🏈

पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.

स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षरपरिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

⚽⚽वाक्यवाचन⚽⚽

♻♻♻♻♻♻♻♻♻♻

मुले शब्द तयार करु लागली की छैट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत.प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत.मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

♻♻जोडाक्षराचे वाचन♻♻

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.र चे चार प्रकार शिकवणे.

परिच्छेद आकलन

दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.

♨♨♨♨♨♨♨♨♨

📝📝प्रकटवाचन📝📝

योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा.शिक्षकांमागोमाग एकएक वाक्य विद्यार्थी वाचतील.पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.

वाचनसाहित्य भरपुर हवे.

परिच्छेदवाचन शब्दडोंगर वाचन घेणे.अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.

  रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवत आहेत

               मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी योग्य  वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगते.

 

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.

२)शब्दभेंड्या खेळ घेणे.

३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.

लेखनाचे उपक्रम

१)धुळपाटीवर लेखन

२)हवेत अक्षर गिरविणे.

३)समान अक्षर जोड्या लावणे.

४)शब्दांची आगगाडी बनवणे.

५)पाहुणा अक्षर ओळखणे.

६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.

७)बाराखडीवाचन करणे.

८)बाराखडीतक्तेवाचन करणे.

९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.

१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.

११)कथालेखन करणे.

१२)कवितालेखन करणे.

१३)चिठठीलेखन करणे.

१४)संवादलेखन करणे.

१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

गणित

१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे

२)वर्गातील वस्तु मोजणे

३)अवयव मोजणे

४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे

५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.

६)आगगाडी तयार करणे

७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.

८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.

९)अंकाची गोष्ट सांगणे.

१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.

११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे

१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.

१३)बेरीजगाडी तयार करणे.

१४)अंकांपुढे वस्तु मांडणे

१५)गठ्ठे सुट्टे सांगणे

१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

१७)वस्तु निवडणे

१८)पाणी पाटी

१९)अक्षर देवून शब्द तयार करणे

२०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे

२१)शब्दकोडे सोडवणे

२२)अक्षरगाडी उदा.

कप ,पर ,रवा ,वात ई.

२३)श्रुत लेखन सराव

२४) अंकाच्यागाड्या

२५)सम ,विषम संख्याच्या गाड्या

२६)सुलभबालवाचन सराव

२७)स्मरणावर आधारीत खेळ

२८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे.