manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Saturday, May 30, 2020

विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश

विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश
येथे क्लिक करा

काही महत्वाची एकके


*काही महत्वाची एकके*

➡ नॉट  सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 1 नॉटिकल मैल=6076 फुट
➡ फॅदम  समुद्राची खोली मोजण्याचे एकक 1 फॅदम=6 फुट
➡ प्रकाशवर्ष तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 1 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर
➡ अँगस्ट्रॉंम प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
➡बार   वायुदाब मोजण्याचे एकक 1 बार=10 डाईन्स दाब/चौ
➡ पौंड  वजन मोजण्याचे एकक 2000 पौंड=1 टन
➡ कॅलरी  उष्णता मोजण्याचे एकक 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
➡अॅम्पीअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
➡मायक्रोन  लांबीचे वैज्ञानिक एकक 1 मायक्रोन=0.001 मिमी
➡ हँड घोड्याची उंची मोजण्याचे एकक 1 हँड=4 इंच
➡ गाठ  कापूस गाठी मोजण्याचे एकक 1 गाठ=500 पौंड
➡रोएंटजेन क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
वॅट शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट
➡हॉर्सपॉवर  स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन    उचलणे.
➡ दस्ता कागदसंख्या मोजण्याचे एकक 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते
➡एकर जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 1 एकर = 43560 चौ.फुट
➡ मैल अंतर मोजण्याचे एकक 1 मैल=1609.35 मीटर
➡हर्टझ -  - विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक .

पुण्यातील विविध संशोधन संस्था


*पुण्यातील विविध संशोधन संस्था*
1)जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)
खोडद-नारायणगाव (पुणे):  येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे. रेडिओ दुर्बिणीचे कार्य कसे चालते याचा ‘लाइव्ह डेमो’ येथे पाहता येतो.
2)राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) (पुणे) : 
-खगोलशास्त्रात संशोधन करणारी ही महत्त्वाची संस्था.
-वातावरणातील प्रकाशकिरण, एक्स रे, गॅमा रे, इन्फ्रारेड, रेडिओ लहरींचा अभ्यास करून त्याचे संशोधन या संस्थेत केले जाते.
- संस्थेतर्फे खोडद येथे जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप उभारण्यात आला आहे.
3)सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंग (सी डॅक)
- विविध प्रकारच्या सुपरकम्प्युटर्सबरोबरच रिमोट व्होटिंग, बायोटेक्नोलॉजी, पेटंटस, रिमोट सेन्सिंग, भारतीय भाषांमध्ये कम्प्युटर्सचा वापर आदीबाबत सी-डॅकमध्ये संशोधन सुरू आहे.
4)आयुका
- ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुढाकारातून पुणे विद्यापीठाच्या आवारात १९८८ मध्ये ही संस्था स्थापन झाली.
- येथे विश्वनिर्मिती, विश्वाचे प्रसरण, सद्यस्थिती, कृष्णविवर, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय लहरी आदीबाबत संशोधन सुरू असते.
- अॅस्ट्रोसॅटच्या निर्मितीत आयुकाचे मोठे योगदान होते.
5)सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (सी-मेट)
-  देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर निर्मितीला चालना देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
- इलेक्ट्रिकल क्षेत्राला लागणाऱ्या विविध पदार्थांवर, छोट्या भागांवर येथे संशोधन चालते.
- पॉलिमर्स, सिरॅमिक्स, मिश्रधातूंची निर्मिती व विकास, नॅनोटेक्नोलॉजीवरही येथे काम चालते.
6)केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (खडकवासला) :
- सिंचनप्रकल्प व जलस्रोतांंविषयी संशोधन करणारी ही संस्था खडकवासल्याजवळ १९१६ मध्ये स्थापन झाली.
- येथे जलस्रोत, जलसंधारण, जलविद्युत आणि जलवाहतूक या संबंधी संशोधन चालते.
- सीडब्ल्यूपीआरएसच्या अलीकडे केंद्रीय जल अकादमी असून येथे पाण्याविषयीचे संशोधन चालते.
7)नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) भोसरीः
- एचआयव्ही हा विषाणू व एड्स या आजाराबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणारी ही संस्था.
8)आगरकर संशोधन संस्था
- महाराष्ट्र अॅकॅडमी फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (एमएसीएस) अंतर्गत १९४६ मध्ये ही संस्था स्थापन झाली.
- संस्थेत प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषी, भूशास्त्र, जैवतंत्रज्ञान आदी विषयातील संशोधन चालते.
- बायोगॅसनिर्मिती, सूक्ष्मजीवांचा औद्योगिक वापर, वनस्पती व धान्यांच्या नव्या प्रजातींविषयी या संस्थेने महत्त्वाचे संशोधन केले आहे.
9)राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)
- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएलआयआर) अंतर्गत येणाऱ्या प्रयोगशाळांपैकी ही एक महत्त्वाची संस्था.
- सर्व प्रकारच्या रसायनांवरील मूलभूत संशोधनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक रसायने, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी व नॅनोटेक्नोलॉजी या विषयांवरील संशोधन येथे चालते.
10)भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संशोधन संस्था
-  मान्सूनवर या संस्थेत व्यापक संशोधन सुरू आहे.
- ढगांचे अंतरंग, वीज कोसळणे, हवामानबदल याबाबत येथे संशोधन चालते.
- देशातील प्रमुख शहरांमधील प्रदूषण व हवेची गुणवत्ता मोजणारा सफर प्रकल्पही येथूनच राबविण्यात येतो.
11)राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)
-  अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनच्या सहकार्याने १९५२ साली ही संस्था पुण्यात स्थापन झाली.
- प्राण्यांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या विषाणूंचा अभ्यास, त्यावर संशोधन करून लस विकसित करण्याचे काम येथे चालते.
- एन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस, मलेरिया व अन्य साथीच्या रोगांवरचे तसेच स्वाईन फ्ल्यू बाबतचे संशोधनही येथे सुरू आहे.
12)भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)
-  हवामानशास्त्रासंबंधीच्या देशभरातील सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवून त्याबाबत संशोधन करणारी ही संस्था सिमल्याहून पुण्यात हलविण्यात आली. त्यामुळे त्याला सिमला ऑफिसही म्हटले जाते.
- हवामानासंबंधीचे संशोधन, अंदाज वर्तविणे, तसेच विविध हवामानशास्त्र उपकरणांचे संशोधन, कृषीबाबत हवामानशास्त्राचा अभ्यास व अंदाज, भूकंपमापन, नोंदी आदी काम येथे चालते.
- हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी पूर्वीपासून वापरली जाणारी उपकरणेही येथे पाहता येतात.

Wednesday, May 27, 2020

स्वा. विनायक दामोदर सावरकर


स्वा. विनायक दामोदर सावरकर : 
(२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). 



        भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’  विनायक दामोदर सावरकर  म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.
१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद  ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी  ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.
           ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.
एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक ⇨ श्यामजी कृष्ण वर्मा  ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१)साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.
लंडनमध्ये असताना विहारी   आणि काळ  ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची  आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.
         १८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन  ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.
लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले ⇨ सेनापती बापट  ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.
           ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर  ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा   ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्‌स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या.                 ,         अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा  ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.
         सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११). सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला  हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. 
            अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल   ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.
सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.
           १९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप  (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.
             अस्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्‌गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.
             सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.
           सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.
            सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.
‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.
दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
            घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी तसे घडले.
भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.
त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व  ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.
              सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले  (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला  हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता  (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप  ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी  (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने  (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात  (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने   ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात  हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे   ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी  (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप  (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स   आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय  (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.
           मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.




संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.
     २. कीर, धनंजय अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.
     ३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे,  १९७०.
     ४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.
    ५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.
     ६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.

Saturday, May 23, 2020

गुणसूत्रे (DNA)

📙 *गुणसूत्रे (DNA) म्हणजे काय ?* 📙

मानवाच्या पेशीत केंद्रक वा भोवतीचा द्रव असे दोन घटक असतात. पेशीतील केंद्रकात डीऑक्सिरायबो, न्यूक्लेइक आम्ल हा कार्बनी रेणू असतो. या रेणूची रचना खालीलप्रमाणे असते.
त्यात दोन साखळ्या एकमेकींत गुंतलेल्या असतात. या द्रव्यात अॅडेनीन, ग्वानीन, सायटोसिन व थायमिन तसेच डीऑक्सीरायबोज ही शर्करा असते. एका साखळीत अॅडेनीन, ग्वानिन, असल्यास तिच्या विरुद्ध साखळीत या घटकांशी दुवा साधणारे थायमिन व सायटोसिन असतात. पेशींचे सर्व संदेश या द्रवांच्या विशिष्ट रचनेच्या सांकेतिक भाषेत असतात. प्रथिने तयार करणे, रंग ठरवणे, डोळ्यांचा रंग ठरवणे, केसांचा प्रकार ठरवणे हे सर्व या द्रव्यांच्या तीन तीन अशा विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. या विशिष्ट रचनांना गुणसूत्रे वा जनुक असे म्हणतात. अनेक गुणसूत्रांच्या समुच्चयाला रंगसूत्रे असे म्हणतात.
 गुणसूत्रांवर आपला रंग, नाकाचा आकार (चाफेकळी वैगरे) उंची, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग इत्यादी ठरत असते. साहजिकच काही रोगांमुळे म्हणा वा अन्य कारणांमुळे या गुणसूत्रांवर विपरीत परिणाम झाला, तर जन्मजात वैगुण्ये निर्माण होतात. अनुवांशिक आजार देखील या गुणसूत्रातील गुणांमुळेच होतात. मधुमेह, रक्तदाब, मनोविकार असे अनुवांशिक रोग गुणसूत्रांमुळेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीला होतात.
लिंग ठरविणाऱ्या गुणसूत्रांच्या समुच्चयाला लिंगसूत्रे असे म्हणतात. मानवी शरीरातील सर्व पेशीत ४६ रंगसूत्रे असतात. त्यापैकी दोन लिंग सूत्रे असतात. पुरुषांत X, Y ही लिंगसूत्रे तर स्त्रीत X, X ही लिंगसूत्रे असतात. फलनाच्या क्रियेत शुक्राणू व स्त्रीबीजाचे मीलन होताना पुरुषांकडून २२X वा २२Y अशी रंगसूत्रे स्त्रीला मिळतात. स्त्रीकडून २२X हीच रंगसूत्रे येतात व त्यांच्या संयोगाने अनुक्रमे ४४XX म्हणजे मुलगी किंवा ४४XY म्हणजे मुलगा जन्माला येतो. यावरून मुलगा होणार की मुलगी यासाठी पुरुषाची लिंगसुत्रेच जबाबदार असतात. अशी ही गुणसूत्रे मानवी शरीराच्या वाढीचा विकासाचा जणू साठवून ठेवलेला गोषवाराच !

Thursday, May 21, 2020

तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगाली वेंकय्या


                 *तिरंग्याचे आद्य रचनाकार*
                 🇮🇳 *पिंगाली वेंकय्या* 🇮🇳

                
*जन्म : 2 ऑगस्ट 1876*
[भटलापेनुमारू , मछलीपट्टनम जवळ , मद्रास प्रेसीडेंसी , ब्रिटीश भारत (सध्याचे आंध्र प्रदेश , भारत)]
*मृत्यू : 4 जुलै 1963 (वय 86)*
                   ( भारत )
राष्ट्रीयत्व : भारतीय
साठी प्रसिद्ध : भारतीय राष्ट्रीय    
                      ध्वजाची रचना
      भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.
         कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील भटलापेन्नुमारू येथील हनुमंतरायुडू आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी २ ऑगस्ट 1876 रोजी पिंगाली यांचा जन्म झाला. देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.
पिंगाली यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
             १९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांनी सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळी पर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते. बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.
           १९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता. गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.
*जाणून तिंरग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया यांच्याबद्दलच्या १० खास गोष्टी*
♦वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
🔸याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिके मध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
🔹पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.
🔸त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या.
♦३१ मार्च १९२१ मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा  झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
🔸१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
🔹पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
♦१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी  २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.
🔹२०११ साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
🔸मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे
                     🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

बालशहीद शिरीषकुमार मेहता

                    *बालशहीद शिरीषकुमार मेहता*
   


*जन्म : 28 डिसेंबर 1926*
     (नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)

*वीरमरण : 9 सप्टेंबर 1942*
                 *(वय 15)*
      (नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

साठी प्रसिद्ध : भारतीय स्वातंत्र्य
                     चळवळ

           पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्‌वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.

         नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्‌' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.

🇮🇳 *नहीं नमशे, नहीं नमशे !*
        महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्‌'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, *"गोळी मारायची तर मला मार!'*. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
                     🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

Tuesday, May 19, 2020

भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक

*⛃भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक*⛃ :
⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏
👉🏻 *दर्पण* - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832

👉🏻 *दिग्दर्शन* (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840

👉🏻 *प्रभाकर*(साप्ताहिक) - भाऊ महाराज

👉🏻 *हितेच्छू* (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

👉🏻 *काळ* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

👉🏻 *स्वराज्य पत्र* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

👉🏻 *केसरी* - लोकमान्य टिळक

👉🏻 *मराठा* (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक

👉🏻 *दिंनबंधू*(साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर

👉🏻 *समाज स्वास्थ* (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे

👉🏻 *विध्यर्थी* (मासिक) - साने गुरुजी

👉🏻 *कॉग्रेस*(साप्ताहिक) - साने गुरुजी

👉🏻 *साधना*(साप्ताहिक) - साने गुरुजी

👉🏻 *शालापत्रक* - कृष्णशास्त्री चिपळूणकर

👉🏻 *उपासना* (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे

👉🏻 *सुबोध पत्रिका*- प्रार्थना समाज

👉🏻 *महाराष्ट्र धर्म* (मासिक) - आचार्य विनोबा भावे

👉🏻 *मानवी समता* -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)

👉🏻 *सुधारक* (साप्ताहिक) - आगरकर

👉🏻 *बहिष्कृत भारत* (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 *मूकनायक* (पाक्षिक) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 *जनता* (प्रबुध्द भारत) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 *समता* -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 *मानवता* -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 *बहिष्कृत मेळा* -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 *सार्वजनिक सभा* (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे

👉🏻 *इंदुप्रकाश* - महादेव गोविंद रानडे

👉🏻 *हिंदुस्थान गदर* (साप्ताहिक) - लाला हरदयाळ

👉🏻 *श्रद्धा* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

👉🏻 *विजय* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद 

👉🏻 *अर्जुन* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद*


👉🏻 *सदधर्म प्रचार* (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

👉🏻 *वंदे मातरम* - अरविंद घोष

👉🏻 *पंजाबी पिपल्स* - लाला लजपतराय

👉🏻 *नॅशनल हेरॉल्ड* - पंडित जवाहरलाल नेहरू

👉🏻 *फॉरवर्ड* (मासिक) - सुभाषचंद्र बोस

👉🏻 *इंडियन सोशॉलिस्ट* - श्यामजी कृष्ण वर्मा

👉🏻 *रास्त गोफ्तर* - दादाभाई नौरोजी

👉🏻 *व्हाईस ऑफ इंडिया* -  दादाभाई नौरोजी 

👉🏻 *बंगाली* - सुरेंद्र नाथ बनर्जी

👉🏻 *इंन्डीपेन्डस इंडिया* - मानवेंद्रनाथ रॉय

👉🏻 *द व्हेगाड* -  मानवेंद्रनाथ रॉय

👉🏻 *उद्बोधक* (बंगाली) - स्वामी विवेकानंद

👉🏻 *प्रबुद्ध भारत* (इंग्रजी) - स्वामी विवेकानंद

👉🏻 *नवजीवन* (गुजराती साप्ताहिक) - महात्मा गांधी

👉🏻 *हरिजन*- महात्मा गांधी 

👉🏻 *यंग इंडिया* - महात्मा गांधी

👉🏻 *इंडियन ओपीनियन* - महात्मा गांधी

👉🏻 *मिरत-उल-अखबर* - राजा राममोहन रॉय 

👉🏻 *समाचार चंडिका*- राजा राममोहन रॉय

👉🏻 *बेगॉल हेरॉल्ड* - राजा राममोहन रॉय 

👉🏻 *संवाद कौमुदी*- राजा राममोहन रॉय 

👉🏻 *कैवारी*  - भास्कर जाधव

👉🏻 *भाषांतर* (मासिक) - वि. का. राजवाडे

👉🏻 *मराठवाडा* - सदाशिव विश्वनाथ पाठक

👉🏻 *महाराष्ट्र केशरी* - डॉ. पंजाबराव देशमुख

👉🏻 *अखंड भारत* - भाई महादेवराव बागल

👉🏻 *शतपत्रे*- गोपाळ हरी देशमुख

👉🏻 *टाईम्स ऑफ इंडिया* - रॉबर्त नाईट

👉🏻 *हितवाद* - गोपाळ कृष्णा गोखले

👉🏻 *युगांतर* - भूपेंद्र दत्त

Sunday, May 17, 2020

चले जाव चळवळ १९४२

            *चले जाव चळवळ १९४२*
               *भारत छोडो आंदोलन* 
                     *ऑगस्ट क्रांती*

 हे ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य  प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

⚱ *भारत छोडो आंदोलन*
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
             सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.

💎 *चळवळीची कारणे*
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण

⚖ *छोडो भारत चळवळीची* *अपयशाची कारणे*
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद

 🏮 *इतर कारणे*

⏰ *त्रिमंत्री योजना*
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

🙋‍♂ *चलेजाव आंदोलन (१९४२)*
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात, ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
▶ प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
▶  या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था
सांभाळली.
▶ सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
▶ या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
▶ काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
▶ व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
▶ मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
▶ भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
▶ निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
▶ स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
🇮🇳 *भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले*
      क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादी गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

👮 *नेताजी सुभाष चंद्र बोस*
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

🔫 *आझाद हिंद सेना*
           ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
🚣 *भारतीय नौदलाचा उठाव*
           आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

🕵 *माउंटबॅटन योजना*
२४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

अहिल्याबाई होळकर


                   *पुण्यश्लोक राजमाता*
                  *अहिल्याबाई होळकर*
                   
*जन्म : ३१ मे  १७२५*
(चौंडीगाव , जामखेडतालुका, अहमदनगर , महाराष्ट्र, भारत)
*मृत्यू : १३ ऑगस्ट १७९५*
               ( महेश्वर )
पूर्ण नाव : अहिल्याबाई खंडेराव
                 होळकर
पदव्या : पुण्यश्लोक
अधिकारकाळ : ११ डिसेंबर १७६७ - १३ ऑगस्ट  १७९५
राज्याभिषेक : ११ डिसेंबर १७६७
राज्यव्याप्ती : माळवा
राजधानी : इंदोर
पूर्वाधिकारी : खंडेराव होळकर
दत्तकपुत्र : तुकोजीराव होळकर
उत्तराधिकारी : तुकोजीराव
                      होळकर
वडील : माणकोजी शिंदे
राजघराणे : होळकर
🎠 *जीवन*
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते.
               बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.
              मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
              एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.
          ह्या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
             अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
          राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात बाईंंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
👸🏻 *शासक*
               इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
          "चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
              पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.
                 पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे- काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.
          अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.
         अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, इंदूर येथील विश्व विद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे.
               भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
                 महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.
🔮  *अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते*
        "अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."
             "ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती."         
                "आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.
           अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.
           अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे. " वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
          "या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची ने-आण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.
          वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत निमाली.
             भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती.
             अहिल्यादेवीच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.
             या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव   "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे".
                   तसेच महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे करण्यात आले आहे.
🏤 *होळकर यांची देशभरातील कामे*
अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अंबा गाव – दिवे.
अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चिखलदा – अन्नछत्र
चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जामघाट – भूमिद्वार
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हार गौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
तराना – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
नैम्बार (मप्र) – मंदिर
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुणे (महाराष्ट्र) – घाट
पुष्कर – गणपती मंदिर, मंदिरे, धर्मशाळा व बगीचा.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
बिठ्ठूर – ब्रह्मघाट
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
भरतपूर – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भीमाशंकर (महाराष्ट्र) - गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
सप्‍तशृंगी – धर्मशाळा.
संभल (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
सिंहपूर – शिव मंदिर व घाट
सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
हांडिया – सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा
हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
📚  *प्रकाशित पुस्तके*
▪'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
▪'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
▪'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
▪अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
▪अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
▪अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
▪कर्मयोगिनी : लेखिका - विजया जहागीरदार
▪पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (जनार्दन ओक)
▪महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी
▪अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
▪शिवयोगिनी (कादंबरी, लेखिका - नीलांबरी गानू)
▪'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर
📽 *चित्रपट*

            "देवी अहिल्याबाई" या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाईची-(खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती.
         अहिल्याबाईच्या जीवनावर इंदूरच्या Educational Multimedia Research Centerने एक २० मिनिटांचा माहितीपट बनवला होता.
                        🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
                

राष्ट्रगीत

                           *राष्ट्रगीत*
                🇮🇳  *जन गण मन...* 🇮🇳

            जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.

🇮🇳 *शब्द*

जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.

जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.

जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.

*प्रवाद*

या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही कविता देवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले जाते. बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी २६ डिसेंबर रोजी गीत लिहिले ते ‘जन गण मन.’ २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वत: चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.

🇮🇳 *गीताचा आशय*

या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.

🇮🇳 *राष्ट्रगीत म्हणून मान्यता*

घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.

🇮🇳 *जन गण मन पूर्ण गीत*

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता

पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग

विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय गाथा

जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री

तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री

दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे

संकंट दुखयात्रा

जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले

गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले

तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे

तव चरणे नत माथा

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

🇮🇳 *जन गण मन .... गीताचा अर्थ*

राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....

जन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता

तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!

पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग।

पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.

विंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग। विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.

गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

तव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता।

हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.

जय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है।।

तुझा जयजयकार ! त्रिवार जयजयकार !!

 🇮🇳 *भारत माता की जय !!*🇮🇳

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

               

Saturday, May 16, 2020

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे माहिती

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे माहिती

सह्याद्रि

🔹 सह्याद्रि

पश्र्चिम घाट, सह्य पर्वत.
भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.

▪️भूवैज्ञानिक इतिहास

सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.

ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.

अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.

▪️भूविशेष

सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.

पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.
सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.

सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.
म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.

तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.

पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.

चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.

पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.

▪️नदया

भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.

सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.

कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.

तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.

पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.

सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.

▪️हवामान

समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.

बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.

▪️वने

पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.

सस.पासून  सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :

(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.

(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.

(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).

(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.

(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी  राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.

(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.

(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.

सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.

सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.

वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.
पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.

▪️जैवविविधता

पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.

भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.

पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.

निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.

कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.

ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.

भारतीय नदी(INDIAN RIVERS)

भारतीय नदी(INDIAN RIVERS)
****************************


*1 सिन्धु नदी* :-
•लम्बाई: (2,880km)
• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट
• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,
झेलम, चिनाब,
रावी, शिंगार,
गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह
—————————————
*2 झेलम नदी*
•लम्बाई: 720km
•उद्गम स्थल: शेषनाग झील,
जम्मू-कश्मीर
•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,
सिंध जम्मू-कश्मीर,
कश्मीर
—————————————
*3 चिनाब नदी*
•लम्बाई: 1,180km
•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट
•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर
—————————————
*4 रावी नदी*
•लम्बाई: 725 km
•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,
कांगड़ा
•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब
————————————–
*5 सतलुज नदी*
•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल
•सहायक नदी : व्यास, स्पिती,
बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब
————————————
*6 व्यास नदी*
•लम्बाई: 470
•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,
हुरला
—————————————
*7 गंगा नदी*
•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से
• सहायक नदी: यमुना, रामगंगा,
गोमती,
बागमती, गंडक,
कोसी,सोन,
अलकनंदा,
भागीरथी,
पिण्डार,
मंदाकिनी, उत्तरांचल,
उत्तर प्रदेश,
बिहार,
————————————–
*8 यमुना नदी*
•लम्बाई: 1375km
•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर
•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,
टोंस, गिरी,
काली, सिंध,
आसन
————————————-
*9 रामगंगा नदी*
•लम्बाई: 690km
•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से
• सहायक नदी:खोन
—————————————
*10 घाघरा नदी*
•लम्बाई: 1,080 km
•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)
• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,
कुवाना, राप्ती,
चौकिया,
————————————–
*11 गंडक नदी*
•लम्बाई: 425km
•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,
त्रिशूल, गंगा
————————————–
*12 कोसी नदी*
•लम्बाई: 730km
•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी
(गोंसाईधाम)
•सहायक नदी: इन्द्रावती,
तामुर, अरुण,
कोसी
————————————–
*13 चम्बल नदी*
•लम्बाई: 960 km
•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से
•सहायक नदी :काली सिंध,
सिप्ता,
पार्वती, बनास
—————————————
*14 बेतवा नदी*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश
—————————————
*15 सोन नदी*
•लम्बाई: 770 km
•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से
•सहायक नदी:रिहन्द, कुनहड़
—————————————
*16 दामोदर नदी*
•लम्बाई: 600km
•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व
•सहायक नदी:कोनार,
जामुनिया,
बराकर झारखण्ड,
पश्चिम बंगाल
—————————————
*17 ब्रह्मपुत्र नदी*
•लम्बाई: 2,880km
•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)
•सहायक नदी: घनसिरी,
कपिली,
सुवनसिती,
मानस, लोहित,
नोवा, पद्मा,
दिहांग अरुणाचल प्रदेश, असम
————————————
*18 महानदी*
•लम्बाई: 890km
•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर
•सहायक नदी: सियोनाथ,
हसदेव, उंग, ईब,
ब्राह्मणी,
वैतरणी मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
उड़ीसा
————————————–
*19 वैतरणी नदी*
• लम्बाई: 333km
•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा
—————————————
*20 स्वर्ण रेखा*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,
झारखण्ड,
पश्चिम बंगाल
—————————————
*21 गोदावरी नदी*
•लम्बाई: 1,450km
•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से
•सहायक नदी:प्राणहिता,
पेनगंगा, वर्धा,
वेनगंगा,
इन्द्रावती,
मंजीरा, पुरना महाराष्ट्र,
कर्नाटक,
आन्ध्र प्रदेश
———–;;—;——————–
*22 कृष्णा नदी*
•लम्बाई: 1,290km
•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट
•सहायक नदी: कोयना, यरला,
वर्णा, पंचगंगा,
दूधगंगा,
घाटप्रभा,
मालप्रभा,
भीमा, तुंगप्रभा,
मूसी महाराष्ट्र,
कर्नाटक,
आन्ध्र प्रदेश
—————————————
*23 कावेरी नदी*
•लम्बाई: 760km
•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी
•सहायक नदी:हेमावती,
लोकपावना,
शिमला, भवानी,
अमरावती,
स्वर्णवती कर्नाटक,
तमिलनाडु
—————————————
*24 नर्मदा नदी*
•लम्बाई: 1,312km
•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी
•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,
दूधी, बर्ना मध्य प्रदेश,
गुजरात
————————————–
*25 ताप्ती नदी*
•लम्बाई: 724km
•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)
•सहायक नदी: पूरणा, बेतूल,
गंजल, गोमई मध्य प्रदेश,
गुजरात
—————————————
*26 साबरमती*
•लम्बाई: 716km
•उद्गम स्थल: जयसमंद झील
(उदयपुर)
•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,
गुजरात
————————————-
*27 लूनी नदी*
•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,
बांडी राजस्थान,
गुजरात,
मिरूडी,
जोजरी
————————————–
*28 बनास नदी*
•उद्गम स्थल: खमनौर पहाड़ियों से
•सहायक नदी :सोड्रा, मौसी,
खारी कर्नाटक,
तमिलनाडु
—————————————
*29 माही नदी*
•उद्गम स्थल: मेहद झील से •सहायक नदी:सोम, जोखम,
अनास, सोरन मध्य प्रदेश,
गुजरात
——————