manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Friday, July 22, 2022

हर घर तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव



  

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती ठेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात 'हर घर झंडा' हा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. राज्य शासनाचे या संदर्भात GR दि 20 जून 2022 रोजी पारित केला आहे. हर घर झंडा या उपक्रमाचे नाव केंद्र शासनाच्या सूचनेनुसार व दि 30 जून 2022 च्या GR नुसार 'हर घर मे तिरंगा असे करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना एकत्रित रित्या खालील प्रमाणे देण्यात येत आहेत.


1. सर्व शासकीय निम शासकीय यंत्रणांनी प्रसारमाध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी.


2. दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे.


3. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन उभारणीसाठी त्यांना प्रेरित करावे.

4. सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.


5. केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कापलेल्या किंवा विणलेल्या लोकर सुती सिल्क खादी कापडापासून बनवलेला असेल या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादी कापडापासून बनवलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. 

6. संगीतातून ही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येत येईल.


7. हर घर झंडा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी.


8. या उपक्रमामध्ये राज्य, देशातील, प्रदेशातील सहभागी

होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्यावी. 9. राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होणे बाबत खात्री संबंधित यंत्रणांनी करावी.


10. ऑनलाइन ऑफलाईन राष्ट्रध्वज विक्री केंद्र राज्याने उपलब्ध करून द्यावे.


11. भारतीय दिवस संहितेची पालन व्हावी व जाणते अजानतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करावी.

..


12. हर घर झंडा या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे छायाचित्रे , चित्रफिती ध्वनी मुद्रण इत्यादी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in संकेतस्थळावर अपलोड करावे.


13. नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत रुची निर्माण करण्यासाठी वेबसाईट, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात यावा.


14. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरिकांची निगडित यंत्रणांचा वापर करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा. याबाबतचा मार्गदर्शक कृती आराखडा सोबत परिशिष्ट मध्ये दर्शवण्यात आला आहे.


कृती आराखडा: शाळा आणि महाविद्यालय

शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत जाणीव करणे. सदर योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा.

राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने, शिबिरे चर्चासत्रची आयोजन करावे.

#hargharjhanda या हॅश tag खाली समाज माध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करावीत. राज्य , जिल्हा, शाळेचा उल्लेख करून सोशल मीडियावर फोटो शेअर करावेत

पालकांचा सहभाग सर्व पालकांना सहभागी होण्यासाठी विशेष दैनंदिन सूचना पत्रे पत्रके वितरीत करावीत.

          

                           वाचा शासन निर्णय  






        

Tuesday, June 7, 2022

10 वी परीक्षा मार्च निकाल 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि २ जून २०२३ रोजी दुपारी ठीक १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील.


दुपारी ठीक १ वाजता खालील लिंक वर निकाल पाहण्याकरिता परीक्षा सिट/रोल नंबर व आईचे नाव आवश्यक आहे.

अधिकृत संकेतस्थळ :


www.mahresult.nic.in 


http://sscresult.mkcl.org 


https://ssc.mahresults.org.in 

 


https://www.indiatoday.in/education-today/results 


http://mh10.abpmajha.com


https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th 


 सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck. 




Monday, June 6, 2022

इ.11वी प्रवेश प्रक्रिया 2022-23

 

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु 2022-23 -


 सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील. संचालनालयाचे पत्र जाक्र. २४१८ दि. १३/०४/२०२२ अन्वये प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक पूर्वतयारी करणेबाबत आपणास सूचित करण्यात आलेले आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

विद्यार्थ्यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे :-

■ विद्यार्थी नोंदणी / Student Registration11th FYJC registration 2022-23 Maharashtra

( विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे )

■ प्रवेश अर्ज भाग-१ भरणे. 11th FYJC Part 1 form filling 2022-23

( भरलेला अर्ज आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे. )

■ पसंतीक्रम देणे , भाग-२ (Option Form) भरणे. 11th FYJC Part 2 form filling 2022-23

 ( प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे )

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती

◆ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील.

1 ) केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats) किंवा

2 ) कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून

● प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-१ भरुन प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा भाग-२ पसंतीक्रम भरुन विद्यालये निवडता येतील. (किमान १ व कमाल १०)

● विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या विद्यालयास संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करावयाचा आहे.

11 वी ऑनलाईन प्रवेश फॉर्म ( Student Registration ) कसा भरावा ?

अर्ज भरतांना केवळ ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहारांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा. राज्यातील उर्वरित ठिकाणच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा.

विद्याथ्यांकरीता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा :- विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा , प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक २३ मे ते २७ मे २०२२ या कालावधीत पोर्टलवर Demo Login सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये विद्याथ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्याची कार्यवाही दि. ३० मे २०२२ पासून सुरु होईल त्यापूर्वी Demo Login मध्ये भरलेली माहिती नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवावयाचा आहे. याबाबत पुरेशी जागरुकता करण्यात यावी.

विद्यालयांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती

परवानगी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पोर्टलवर करतांना शासन मान्यता पत्र, संलग्न स्तर उपलब्ध वर्गखोल्या यांची तपासणी करुन माध्यमनिहाय प्रवेश क्षमता निश्चित करावी तसेच यापूर्वी नोंदणी झालेल्या विद्यालयांची माहिती वरीलप्रमाणे पुनश्च तपासून ती सुधारित / अंतिम करावी. सदर विद्यालयांची माहिती EDIT करण्याची सुविधा पोर्टलवर देण्यात येईल. शासन नियमानुसार तुकडीनिहाय विहित अधिकतम प्रवेश क्षमता पोर्टल आपोआप दर्शवल, ती प्रवेश क्षमता भौतिक सुविधांचे उपलब्धतेनुसार कमी नोंदविता येईल.

ज्या विद्यालयांनी UDISE नंबर घेतलेले नाहीत त्यांना तात्पुरता लॉगीन आयडी देण्यात येईल तथापि त्यांनी UDISE No. त्वरीत मिळविणे आवश्यक राहील.

अनुदानित वर्गासाठी लागू शासन विहित शुल्क दर आपोआप दर्शविण्यात येतील. उर्वरित बिना अनुदानित, स्वयंअर्थसहायित वर्गासाठी शुल्क दर विहित पद्धतीने निश्चित केले आहेत याची तपासणी करून ते पोर्टलवर अंतिम करावेत.

इ ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक
11 वी प्रवेश महत्वाच्या तारीखा 

1 मे ते 14 मे 2022 ऑनलाइन फॉर्म भरण्याचा सराव (Demo).

17 मे 2022 - 11 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास व पडताळणीसाठी सुरुवात.

11वी पार्ट 1 फॉर्म भरण्याची सुरुवात 17 मे 2022 पासून ते निकाल लगे पर्यंत.

शाळा व महाविद्यालय नोंदणी 23 मे 2022 पासून ते निकाल जाहीर होई पर्यंत 

विभागाचे नावकेंद्रीय 11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2022विभाग फक्त मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर ऑफिशियल वेबसाईट  https://11thadmission.org.in11 वी ऑनलाइन प्रवेश रजिस्ट्रेशन04 मे  2022 ( Demo)
17 मे 2022 सुरुवातफॉर्म वेरीफाय करणे17 मे 2022 ते निकाल लागे पर्यंत11 वी ऑनलाइन पार्ट - 1 सुरवात17 मे 2022 ते निकाला पर्यंत11 वी ऑनलाइन ऑप्शन फॉर्म सुरवात पार्ट - 2 लवकरच अपडेट केले जाईलतात्पुरती मेरिट लिस्ट लवकरच अपडेट केले जाईलअंतिम मेरिट लिस्ट  लवकरच अपडेट केले जाईलमिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणेलवकरच अपडेट केले जाईल