manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Friday, December 11, 2020

बाबू गेनू सैद

 

बाबू गेनू सैद 



जन्म(इ.स. १९०9; महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, जि:पुणे
मृत्यू:-डिसेंबर १२इ.स. १९३०मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. 12 डिसेम्बर 1930 ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत यात्रेस 20000 हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) सम्शण भूमीत तयांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबू गेनूचं जन्मगाव महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे. गेनू कृष्णाजी सैद नावाच्या एका गरीब शेतकऱ्याचा तो मुलगा. त्याचं कुटुंब म्हणजे आई, वडील, दोन ज्येष्ठ बंधू आणि एक बहीण. घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यांच्याकडे ऐश्वर्याची एकच खूण होती, त्यांचा एक बैल. जो शेती करायला त्यांना मदत करायचा. गेनू सैद हे बाबू दोन वर्षांचा असताना जग सोडून गेले. मग बैल गेला. आणि दारिद्र्याचा अंधार घरभर पसरला. त्या अंधारात किमान एक छोटी पणती पेटवता यावी, म्हणून बाबू गेनूची आई मुंबईत येऊन घरोघरी घरकाम करायला लागली. तिने मुलं चक्क शेजारांच्या जीवावर गावी ठेवली. मुंबईला जाताना तिला केवढा मोठा दगड काळजावर ठेवायला लागला असेल. विचार करा. त्यामुळे बाबू गेनू आणि पुस्तकी शिक्षण याचा दुरान्वयानेही संबंध आला नाही. पण माणूस फक्त पुस्तकातूनच शिकतो असं नाही. हूशार असेल. त्याचं मन संवेदनक्षम असेल. तर जगात वावरताना तो ज्ञानकणं जमवत जातो. बाबू गेनूनेही तेच केलं.

थोडा मोठा झाल्यावर बाबू गेनू मुंबईत आला. आणि गिरणी कामगार झाला. त्याला कधी काम असे, कधी नसे. गिरणीत नाव वडिलांपर्यंत लिहायची पद्धत होती. म्हणून बाबू गेनू सैदचा बाबू गेनू झाला.

तो फिनिक्स मिलच्या चाळीत राहत असे. तिथलं जग आता बदललंय. ती वस्ती आता अब्जाधीशांची आहे. त्यांचा स्वदेशीची संबंध नाही. त्यांना बाबू गेनू आठवत असेल तर ट्रम्प द्वारकानाथ संझगिरीचं लिखाण वाचतात यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे.

मुंबईच्या वास्तव्यात बाबू गेनू महात्मा गांधीजींच्या चळवळीकडे ओढला गेला. भगतसिंग त्याला स्फूर्ती देत असे. पण महात्माजींच्या अहिंसक मार्गावर त्याचा विश्वास होता. तो काँग्रेसचा चार आण्याचा मेंबर झाला. आजच्या काँग्रेसच्या मंडळींनाही त्याचं नाव ठावूक नसेल. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक होता, 81941. राजकीय कामामुळे तो मोठया भावांच्या लग्नाला जाऊ शकला नाही. आई गेल्यावर तो सर्वस्व ओतायला अधिक मोकळा झाला.

1930 च्या सुमारास महात्माजींनी परदेशी कपड्यांवरच्या बहिष्काराची चळवळ सुरू केली होती. बाबू गेनूला त्यामागचं जागतिक अर्थकारण कळत नव्हतं. त्याला एवढं कळत होतं की, इंग्रज इथला कच्चा माल मँचेस्टरला पाठवतात. आणि तिथल्या मिलमध्ये तयार झालेलं कापड भारतात पाठवून प्रचंड फायदा मिळवतात. इथल्या विणकरांच्या पोटावर आलेला पाय, एकेकाळी निघृण पद्धतीने इंग्रजांनी विणकरांचे तोडलेले हात, गरिबांच्या जाणाऱ्या नोकऱ्या , हे सारं कळण्याइतकी बुद्धिमत्ता बाबू गेनूकडे होती. ब्रिटिशांचा मूळ उद्देश हा आर्थिक लुटालूट आहे. त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी ही चळवळ आहे, हे त्याला कळत होतं. त्यामुळे परदेशी मालाचे ट्रक अडवणं, परदेशी मालाविरुद्ध चळवळीत भाग घेणं, हे त्याने सुरू केलं. आणि मग तो दिवस उजाडला. 12 डिसेंबर 1930. काळबादेवीच्या मुळजी जेठा मार्केट मधून परदेशी माल ट्रकमधून बाहेर जाणार होता. काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे जमा झाले. त्यांनी ट्रक अडवले. फ्रेजर नावाच्या एका उद्योगपतीचे ते ट्रक होते. बाबू गेनूच्या पथकाचं नावं होतं तानाजी पथक. त्यांनी ट्रक अडवले. पोलिसांनी त्यांना हुसकावलं. ते पुन्हा ट्रक समोर झोपले. ब्रिटिश पोलीस सार्जंट यांनी, त्यांच्यावरून सरळ ट्रक घेऊन जा. असे आदेश दिले. ट्रक चालवणारा चालक भारतीय होता. काहींच्या मते त्याचं नाव बलविर होतं. काहींच्या मते विठ्ठल धोंडू. त्याने ब्रेक मारला. आणि त्याने सांगितलं " हे माझे देशवासीय आहेत. त्यांच्या अंगावरून मी ट्रक घेऊन जाणार नाही." गोरा पोलीस सार्जंट चिडला. त्याने स्वतः ट्रक चालवायला घेतला. तरी बाबू गेनू डगमगला नाही. तो ट्रक समोर झोपला. त्या निदर्यी सार्जंटने ट्रक त्याच्या अंगावरून नेला. जमाव अक्षरशः आधी दिगमूड झाला आणि मग पेटला. बाबू गेनूला जवळच्या जीटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्याच्या मेंदूला मोठी इजा झाली होती. आणि वयाच्या 22 व्या वर्षी त्याने त्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 22 हे काय जग सोडण्याचं वय आहे? पण केवढा तो धीरोदात्तपणा. आणि कसं हे जीव तळहातावर घेऊन जगणं. कोरोनाच्या काळात प्रेत घ्यायलाही न जाणाऱ्या नातेवाईकांना वाटणारी जीवाची भीती पाहिली की बाबू गेनूचं धैर्य आभाळाला भेदून वर गेल्यासारखं वाटतं.

त्यानंतर रस्त्यावर जिथे बाबू गेनूचं रक्त सांडलं होतं तिथे जमावाने फुलं टाकली. अचानक ती जागा तीर्थक्षेत्र बनली. बाजूने जाताना लोकं टोपी काढून जावू लागले.

ब्रिटिशांनी मात्र या घटनेची नोंद अपघात अशी केली. ड्रायव्हर बेशुद्ध पडला म्हणून ब्रिटिश सार्जंटने ट्रक स्टेअरिंग हातात घेतलं. त्याचा ताबा सुटला आणि दुर्दैवाने ट्रक बाबू गेनूच्या अंगावरून गेला. त्याला चिरडून टाकण्याचा अजिबात हेतू नव्हता. असं स्पष्टीकरण देण्यात आलं. पण मुंबईच्या जनतेने ते स्पष्टीकरण मानलंच नाही. मुंबई पेटली. जागोजागी परदेशी कपड्यांची होळी झाली. हजारो माणसं प्रेत यात्रेला जमली. त्यांना बाबू गेनूचे अंत्यसंस्कार लोकमान्य टिळकांच्या बाजूला, म्हणजे चौपाटीवर करायचे होते. कसंबसं ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं. तेव्हा गिरगावच्या स्मशानात त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.



Saturday, December 5, 2020

डॉ बाबासाहेब आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर



(१४ एप्रिल १८९१—६ डिसेंबर १९५६). एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्‍नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर सहा वर्षांचे असतानाच त्यांची आई भीमाबाई मरण पावली. आंबेडकरांचे पुढील सर्व पालनपोषण रामजी व त्यांची बहीण मीराबाई ह्यांनी केले. रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले.


आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. या काळात दोन महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या. एक म्हणजे त्यांचे रमाबाई ह्या स्वजातीय, म्हणजे महार जातीच्या, मुलीशी लग्न झाले व दुसरी त्यांचे जीवन प्रभावी होण्यास साह्यभूत झालेल्या केळुसकर गुरूंजीशी त्यांचा निकटचा संबंध आला. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. ह्या पदव्या मिळविल्या.


भारतात परत आल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानची नोकरी धरली. बडोदे येथील वास्तव्यात त्यांना अस्पृश्य म्हणून जे अत्यंत कटू अनुभव आले, त्यांमुळे त्यांनी ती नोकरी सोडली व मुंबईस येऊन सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पतकरली. तोपर्यंत अस्पृश्य म्हणून पदोपदी त्यांची जी मानखंडना झाली, तिचा परिणाम त्यांच्या मनावर फार झाला.


अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरूवात केली; मुंबई येथे ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक काढले, कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची त्याच संस्थानातील माणगाव येथे त्याच वर्षी परिषद घेतली व स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहभोजनांचे कार्यक्रम घडवून आणले.


नागपूर येथे मे १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावेत. या महर्षी शिंद्यांच्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ च्या धोरणाचा या परिषदेत निषेध करण्यात आला. त्यांनी हाती घेतलेल्या ह्या प्राथमिक कार्यातच त्यांचे नेतृत्वाचे गुण दिसून आले.


हे लोकजागृतीचे कार्य चालू असताना, स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याकरिता, ते मुख्यतः आपले स्नेही नवल भंथेना आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीने इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी . ही दुर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. सरकारी विधि-महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाचे व प्राचार्याचेही काम केले. तथापि अस्पृश्यांच्या हिताचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली.


शिकवा चेतवा व संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२६ साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यामुळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सुरुवात केली.


१९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृति जाळली. त्यांच्या काही अनुयायांसह त्यांच्यावर सनातन्यांनी खटला भरला. खटला जिद्दीने लढवून त्यांनी स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका करून घेऊन चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित केला.


१९२८ साली भारतात आलेल्या सायमन आयोगावर इतरांनी बहिष्कार घातला होता. पण अस्पृश्य बंधूचे हित लक्षात घेऊन आंबेडकरांनी मात्र त्या मंडळासमोर आपली साक्ष नोंदवून, अस्पृश्य लोकांकरिता सरकारने काय करावयास पाहिजे, हे सांगितले. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे, म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह १९३० साली नासिक येथे काळराममंदिर-प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यात त्यांना व त्यांच्या अनुयायांना मार खावा लागला, पण पूर्वीच्याच जिद्दीने त्यांचे कार्य चालू राहिले. त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, समता, इ.वर्तमानपत्रांद्वारे त्याचप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी व इतर संस्थाद्वारे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची व स्वच्छतेची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला.


आंबेडकर १९३० मध्ये ⇨ गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. तिन्ही परिषदांना ते उपस्थित राहिले. तेथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू मांडली आणि अस्पृश्यांच्या इतर हक्काबरोबर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली व ती पंतप्रधान मॅक्डॉनल्ड ह्यांनी मंजूरही केली. त्यातूनच गांधी व आंबेडकर ह्यांच्यात मतभेद निर्माण झाले.


गांधीना हा अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी पुणे येथे येरवड्याच्या तुरूंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. त्या वेळी गांधी व आंबेडकर ह्या दोघांत राखीव जागांच्या संख्येबाबत आणि राखीव जागा ठेवण्यासंबंधी घ्यावयाच्या जननिर्देशाच्या मुदतीविषयी चर्चा होऊन २४ सप्टेंबर १९३२ रोजी सुप्रसिध्द ⇨ पुणे करार झाला. त्यान्वये पाच वर्षानंतर जननिर्देश घेण्यात यावा, असे ठरले. या घटनेनंतर तीन वर्षानी त्यांची पत्नी रमाबाई मरण पावली.


त्यांनी स्वतंत्र मजूरपक्षाची स्थापना केली (१९३६). ते प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. १९३९ साली येऊ घातलेल्या संघराज्य पध्दतीला त्यांनी विरोध केला व दारुबंदीच्या धोरणावर टीका केली, १९४२ साली त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन’ नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला.


या पक्षातर्फे अस्पृश्यांकरिता त्यांनी अनेक लढे दिले. १९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. या काळात त्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली व मुंबईस सिध्दार्थ महाविद्यालय सुरू केले. ह्याच संस्थेने पुढे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय स्थापिले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री म्हणून आले. स्वतंत्र भारताच्या संविधानसमितीचे ते सभासद झाले.


पुढे ते संविधान-लेखन-समितीचे अध्यक्षही झाले. अस्पृश्यता नामशेष करणारा संविधानातील ११ वा अनुच्छेद हा आंबेडकरांचा विजयच आहे. सतत परिश्रम घेऊन, चर्चा करून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सु. तीन वर्षांत संविधानाचा मसुदा तयार केला. ह्या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच त्यांनी ‘हिंदु कोड बिल’ लोकसभेला सादर करण्याचा बहुमान मिळविला.


डॉ. शारदा कबीर ह्या सारस्वत महिलेशी १५ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी दुसरा विवाह केला. ह्या सुमारास त्यांचे नेहरूंशी व काँग्रेस धोरणाशी फारसे पटेना. म्हणून मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला.हिंदुधर्म जातिसंस्थेमुळे पोखरला गेला आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. स्पृश्यांकडून अस्पृश्यांवर होत असलेला अन्याय धर्मांतरावाचून दूर होणार नाही, या त्यांच्या दृढ श्रध्देनुसार त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मोठ्या समारंभाने अनेक अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला. यानंतर त्यांनी बौध्द धर्माच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. त्यांच्या मनात ‘रिपब्लिकन पक्ष’ स्थापन करावयाचा होता, परंतु तो त्यांच्या हयातीत स्थापन झाला नाही.


आंबेडकरांना वाचनाचा अतिशय नाद होता. विद्यार्थीदशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही. पुढे ते मुद्दाम चिकाटीने संस्कृत शिकले. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे त्यांना वाटे. मृत्यूसमयी त्यांच्या ग्रंथालयात सु. २५,००० दुर्मिळ ग्रंथ होते.


हिंदुस्थानची आणि काश्मीरची फाळणी ह्या भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने अटळ गोष्टी आहेत, असे त्यांना वाटे . भारताच्या तत्कालीन परराष्ट्रीय धोरणामुळे भारतास एकही सच्चा मित्र राहणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. देवनागरी लिपीतील हिंदी ही राष्ट्रभाषा असावी व ती पूर्णपणे अंमलात येईपर्यंत इंग्रजी भाषा असावी, असे त्यांना वाटे. त्याचप्रमाणे छोटी राज्ये हाच एकमेव राज्यपुनर्रचनेचा मार्ग आहे .असे त्यांचे मत होते. त्यानी दोनदा लोकसभेची निवडणूक लढविली. पण ते पराभूत झाले. तथापि राजकारणातून ते निवृत्त झाले नाहीत.


आंबेडकरांचे ग्रंथरूप लेखन इंग्रजी भाषेतीलच आहे. त्यांनी एम.ए. पदवीकरिता लिहिलेल्या प्रबंधाचा विषय ‘प्राचीन भारतातील व्यापार (एन्शंट इंडियन कॉमर्स)’ असा होता.‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा: एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक अध्ययन’ या विषयावरील त्यांचा प्रबंध पुढे द इव्होल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडियाया नावाने प्रकाशित झाला (१९२४) प्रस्तुत प्रबंधात त्यांनी ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण ब्रिटनमधील उद्योगधंद्याच्या हिताच्या दृष्टीने आखले जाते, हे सिध्द केले. कोणताही देश झाला, तरी त्यात एखाद्या वर्गावर अन्याय चालू असणे साहजिक आहे. पण त्यामुळे त्या देशाला राजकीय अधिकार नाकारता येत नाही, यासारखी तर्कशुध्द मीमांसा प्रस्तुत ग्रंथात आढळते. आंबेडकरांचा अर्थशास्त्रविषयक दुसरा प्रबंध म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी (१९४६) हा होय. रूपयाचे पौंडाशी प्रमाण बसवून इंग्रजी राज्यकर्त्यांनी केवळ इंग्रजी व्यापाऱ्यांचेच हित साधून भारताचे कसे नुकसान केले, यावर त्यांनी प्रस्तुत प्रबंधात प्रकाश टाकला आहे


धर्म आणि जातिसंस्था यांसंबंधी डॉ. आंबेडकरांचे विचार क्रांतिकारक होते. १९३६ साली लाहोर येथील जातपात-तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनातील अध्यक्षीय भाषणॲनाय्‌हिलेशन ऑफ कास्ट‌्स (१९३७) या पुस्तकात त्यांनी प्रसिध्द केले. जातिव्यवस्था ही श्रमिकांच्या अनैसर्गिक विभागणीस व हिंदू समाजाच्या ऐतिहासिक पराभवास, नैतिक अधोगतीस तसेच त्याच्या दुबळेपणास कारणीभूत आहे; जातिव्यवस्थेचा मुख्य आधार म्हणजे हिंदूचा धर्मभोळेपणा असून तो नष्ट करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्या तात्विक अधिष्ठानावर हिंदू समाजाची पुनर्घटना करावी. यासारखी प्रेरक विचारसरणी आंबेडकरानी प्रस्तुत पुस्तकात मांडली आहे. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अन‌्टचेबल्स (१९४५) या ग्रंथात त्यांनी काँग्रेसच्या अस्पृश्योद्वाराच्या कार्यक्रमाच्या मर्यादा आणि अपयश यांची चर्चा केली आहे.


आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्रतीक असलेला ग्रंथ म्हणजे हू वेअर द शूद्राज ?(१९४६) हा होय. विद्यमान शूद्र म्हणजे पूर्वकालीन क्षत्रिय होत. ब्राम्हणांशी संघर्ष झाल्यामुळे त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले, असा निष्कर्ष त्यांनी या ग्रंथात काढला आहे. द अन‌्टचेबल्स (१९४८) या नावाचे त्यांचे पुस्तकही या संदर्भात उल्लेखनीय आहे. बुध्द अँड हिज धम्म हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिध्द झाला (१९५७).


धर्माच्या रूढ कल्पनांहून बौध्द धर्माची कल्पना वेगळी असून ती समाजाच्या पुनर्रचनेशी अधिक निगडित आहे. त्यामुळे सामाजिक व नैतिक मूल्ये हेच बौध्द धर्माचे खरे अधिष्ठान आहे. लो. टिळकांच्या गीतारहस्याप्रमाणे आंबेडकरांनी बौध्द धर्माचे कालोचित रहस्य या भाष्यग्रंथात विशद केले आहे.


आंबेडकरांच्या राजकीय विषयांवरील ग्रंथापैकी थॉट‌्स ऑन पाकिस्तान (१९४०) या पुस्तकात पाकिस्तान झाल्यास हिंदूच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होईल, असा युक्तीवाद केला होता. यांशिवाय रानडे, गांधी अँड जिना (१९४३) थॉट‌्स ऑन लिग्विस्टिक स्टेट‌्स (१९५५) यांसारखी त्यांची पुस्तकेही विचारप्रेरक आहेत. डॉ. आंबेडकरांचे मराठी लेखन अल्प असून ते मुख्यतः त्यांनी काढलेल्या विविध वृत्तपत्रांतून विखुरलेले आहे.


दिल्ली येथे त्यांचे  6 डिसेंबर 1956 रोजी आकस्मिक निधन झाले. श्रेष्ठ कायदेपंडित व अस्पृश्यांचा तडफदार नेता म्हणून आंबेडकरांची स्मृती चिरंतन राहील.


 


Wednesday, November 25, 2020

संविधान दिन

 

                               
   *26 नोव्हेंबर - संविधान दिन*
        *भारताचे संविधान*
*भारतातील सर्वोच्च कायदा*

*भारतीय संविधान उद्देशिका*

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

📜 *इतिहास*

भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्या पैंकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्या पैंकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जाने, इ.स. १९४७)

१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर  १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर  १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

📖 *स्वरूप*

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ३९५ (डिसेंम्बर २०१८) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.

📒 *तोंडओळख व महत्त्वाची अंगे*

भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४ व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थे प्रमाणे भारतीय संसदही द्विगृही (Bicameral) आहे.

📖 *उद्देशिका*

मुख्य पान: भारतीय संविधान उद्देशिका
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे. उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय
आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य
आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते.
मूळ उद्देशिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

🗳 *मूलभूत अधिकार*

भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचारा विरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत.

स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)
कायदा (कलम २०), जीविताचा अधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदेचे स्वातंत्र्य (कलम २२)
शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण
धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य
अल्पसंख्याकांचे अधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य
घटनात्मक तक्रारींचा अधिकार (कलम ३२-३५): मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.
मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती.

📘 *सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे*

राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदे/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन (Judiciary) व प्रशासकीय (Executive) अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४०) मध्ये उल्लेख आहे.

निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ (Vague) असे आहे. वरील पैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्विक मूल्ये (Moral values) असेच त्याचे स्वरूप आहे.

📙 *सत्ता*

सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे -

कार्यकारी (Executive)
कायदेकारी(Legislative)
न्यायालयीन (Judicial)
प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते.

भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही(Unicameral) वा द्विगृही(Bicameral) असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह (Lower House) तर विधानपरिषद हे वरील सभागृह(Upper House) असते.

📔 *संघराज्य प्रणाली*

भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला.

📗 *अधिकृत भाषा*

संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे.

कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते

📙 *आणीबाणीविषयक तरतुदी*

भारताच्या राज्यघटनेत आणीबाणी विषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यात -

राष्ट्रीय आणीबाणी - जेव्हा राष्ट्र वा त्याचा मोठा हिस्सा आपदकालीन स्थितीत असतो तेव्हा
प्रादेशिक आणीबाणी - जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा
आर्थिक आणीबाणी - जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य वा पत धोक्यात असते तेव्हा
अशा तीन आणीबाणींचा समावेश आहे

राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकता. ३५३ व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकटवितात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात.

📗 *कलमांचा गोषवारा*

संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -

भाग १ -
कलम 1 संघाचे नाव आणि भूप्रदेश
कलम 2 - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती
कलम 2(अ)-सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)

कलम 3- नवीन राज्याची स्थापना, सिमा किंवा नावे बदलणे
कलम 4-कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत केलेले बदल, कलम368 अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही
भाग 2 - कलमे 5-11नागरिकत्व
भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क
कलमे १४-१८ समानतेचा हक्क,
कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,
कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,
कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,
कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,
कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.
भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलमे ३६ - ५१
कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन
कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार
भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.
*भाग ५ -*
प्रकरण १ - कलमे ५२-७८
कलमे ५२-६३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,
कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक
कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,
कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत
प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.
कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,
कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,
कलमे ९९-१००
कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,
कलमे १०७-१११ (law making process)
कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,
कलमे ११८-१२२
प्रकरण ३ - कलम १२३
कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत
प्रकरण ४ - कलमे १२४-१४७
कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत
प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.
कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत
भाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.
प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या
कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून
प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत
कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,
कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,
कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.
कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.
प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.
कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती
कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार
कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी
कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत
कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे
कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी
कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी
कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी
प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत
कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.
प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.
कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.
प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.
कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत

📓 *भाग ७ - राज्यांच्या बाबतीतील कलमे.*

कलम २३८ -
भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे
कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत
भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे
कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत
भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.
कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत
भाग १० -
कलमे २४४ - २४४
भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी
प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी
कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी
प्रकरण २ - कलमे २५६ - २६३
कलमे २५६ - २६१ - सामान्य
कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.
कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.
भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत
प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत
कलमे २६४ - २६७ सामान्य
कलमे २६८ - २८१
कलमे २८२ - २९१ इतर
प्रकरण २ - कलमे २९२ - २९३
कलमे २९२ - २९३
प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००
कलमे २९४ - ३००
प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक
कलम ३०० अ -
भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे
कलमे ३०१ - ३०५
कलम ३०६ -
कलम ३०७ -
भाग १४ -
प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४
कलमे ३०८ - ३१३
कलम ३१४ -
प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम
भाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमे
कलमे ३२३ अ - ३२३ बी
भाग १५ - निवडणूक विषयक कलमे
कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे
कलम ३२९ अ -
भाग १६ -
कलमे ३३० -३४२
भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे
प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत
कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत
प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत
कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत
प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी
प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश
कलम ३५० -
कलम ३५० अ -
कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम
कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलम
भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे
कलम ३५९ अ -
कलम ३६० - आर्थिक आणीबाणी
भाग १९ - इतर विषय
कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय
कलम ३६२ -
कलमे ३६३ - ३६७ - इतर
भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत
कलम ३६८ -घटनादुरुस्ती
भाग २१ -
कलमे ३६९ -३७८
कलमे ३७९ - ३९१ -
कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क
भाग २२ -
कलमे ३९३ -३९५

📝 *घटनादुरुस्त्या*

मुख्य पान: भारतीय संविधानातील दुरुस्त्या
राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते.
        🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

  

Tuesday, November 3, 2020

वासुदेव बळवंत फडके


 

श्री वासुदेव बळवंत फडके (सन १८४५-१८८३)


जन्म: ४/११/१८४५,  कुलाबा, जि. शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
वडील: बळवंत फडके
कार्यकाळ: १८४५ - १८८३
मार्गदर्शन: श्री स्वामी समर्थ
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
प्रभाव: महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे
निर्याण/समाधी: १७/२/१८८३, एडन येथे जन्मठेप भोगताना मृत्यू 


आद्य क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते  पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. प्रश्न मनात आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत नसेल तर त्या नोकरीचे मोल काय? त्यात आईचे निधन झाले व शेवटी भेट घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी  कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. १८५७ च्या अयशस्वी क्रांती पर्वानंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा जो सशस्त्र प्रयत्न झाला तो वासुदेव बळवंत फडके यांचे बंडच होय. त्यात त्यांना रामोशी, भिल्ल, आगरी, आणि कोळी तरुणांचा पाठिंबा मिळाला. या वीराच्या स्मरणार्थ स्मारक समिती स्थापन होऊन अनेक सामाजिक कामे केली जातात.

अव्वल इंग्रज काळातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एक थोर दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण गावी झाला. कर्न्याळ्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्याकडे होती. लहानपणापासूनच वासुदेव हूड व बंडखोर वृत्तीचा होता. कल्याण, मुंबई, पुणे येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्या वेळच्या जी. आय. पी. रेल्वेकंपनी, ग्रॅंट मेडिकल कॉलेज इत्यादी ठिकाणी नोकरी करणाऱ्या वासुदेवाच्या मनात इंग्रजी राजवटीविषयी तिरस्कार उत्पन्न होत होता. सत्तावनच्या युद्धाची प्रेरणा त्याच्या मनात होतीच.

पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढवून घेतले होते. दत्ताचे हे रौद्र दर्शन त्यांच्या बंडखोर मनाला प्रेरणा देई. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते.

राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती. 

वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.

येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.

वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.

वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.

”दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवासाठी दिल्या; मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्या साठी का देऊ नये?” - वासुदेव बळवंत फडके. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक हुतात्मा वासुदेव बळवंत फडके यांच्या त्यांच्या देश सेवेस त्रिवार वंदन. तसेच अध्यात्मिक जीवनास परिपूर्ण म्हणता येईल. त्यांनी राष्ट्रकार्य अध्यात्मिक जीवनाने परिपूर्ण केले.

वासुदेव बळवंत फडके यांचे निधन !

माघ शुद्ध एकादशी शके १८०४ मध्ये या दिवशी महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथील काराग्रुहात निधन झाले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील तुरूंगात डांबुन रहावे लागले होते. त्यांचा मुक्त आत्मा रोगांनी जर्जर झालेल्या शरिरात तडफड करीत होता. दोन वर्षांपूर्वीच तूरूंगातून पळुन जाण्याचा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केला होता. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अधिकची बंधने घातली होती. जीवन अधिक कष्टदायक झाले होते. मन व शरिर खंगुन गेल्याने उत्साह पार मावळला होता. दुर्धर अशा क्षयरोगाने त्यांना पछाडले होते. तेथील अधिकारी त्यावेळी फलटन येथील डॉ. बर्वे हे होते. ओळखीचे, जवळचे आणि मायेचे एकच व्यक्ती म्हणजे डॉ. बर्वे. वासुदेव बळवंतांना आता फक्त म्रुत्युची आशा राहिली होती. घरदार शेकडो मैलांवर राहिले होते. म्रुत्युची वाटचाल करणारे वासुदेव इंग्रज सरकारवर मनातुन चरफडत होते. आणि माघ शुद्ध एकादशीचा दिवस उजाडला त्यांच्या अंगातील ताप वाढला. अखेरची घटका जवळ आली व सायंकाळी साडेचारच्या सुमारास वासुदेव बळवंत यांचे निधन झाले

Thursday, October 15, 2020

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 भारताचे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय – 




वास्तविक नाव (Real Name)अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलामजन्मतिथी (Birthday)१५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारतवडिलांचे नाव (Father Name)जैनुलाब्दिन मारकयारआईचे नाव (Mother Name)आशिमा जैनुलाब्दिनविवाह (Wife Name)अविवाहितशैक्षणिक योग्यता (Education)१९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून,


एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून


भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली.


मृत्यू तिथी(Death)२७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय, भारत.-


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म, त्यांचा परिवार आणि त्यांचे सुवातीचे जीवन – Abdul Kalam Information in Marathi


 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली तामीळनाडू राज्यातील रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावात एका मच्छीमार कुटुंबात झाला होता.


त्यांचे पूर्ण नाव अवुल पकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम होते.  ते त्यांच्या परिवारातील जैनुलअबिदीन आणि अशिअम्मा यांचे सर्वात लहान संतान होते.


अब्दुल कलाम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची नव्हती. त्यामुळे त्यांचे वडिल मच्छीमार लोकांना आपली नाव भाड्याने देऊन आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत असत.


अब्दुल कलाम हे त्यांचा परिवारातील सर्वात लहान सदस्य होते. त्यांना तीन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती. घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्यांना सुरवातीपासूनच खूप परिश्रम करावे लागले होते.


आपली खालावलेली परिस्थिती पाहून ते कधीच गडबडले नाहीत. याउलट ते   त्यांच्या अंगी असलेल्या दृढनिश्चय सोबतच प्रामाणिकपणे मेहनत करीत   आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत राहिले. अश्याप्रकारे समोर जाऊन त्यांनी आपल्या जीवनात फार मोठे यश सम्पादन केले.


अब्दुल कलाम यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष – APJ Abdul Kalam Education


अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावी  एका गरीब कुटुंबात झाला असल्याने त्यांना आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी  खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला.


कलाम आपले शालेय शिक्षण घेत असतांना पेपर वाटायचे काम करीत असत,


आणि त्यातून मिळणाऱ्या पैस्यातून ते त्यांचा शालेय खर्च भागवत असत.


कलाम यांनी त्यांचे सुरवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम स्च्वार्त्ज़ मैट्रिकुलेशन शाळेत पूर्ण केले.


यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण १९५० साली तामिळनाडूतील  तीरुचीरापिल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ्स महाविद्यालया मधून  भौतीकशास्त्र विषयाची पदवी घेतली.


आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी १९५४ ते  १९५७ च्या कालावधी दरम्यान मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनियरींग मध्ये डिप्लोमा केला होता.


अश्या प्रकारे त्यांनी कठिण परिस्थिती असतांना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेऊन काही कालावधी नंतर,  अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली.


अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते. ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच सबंध नव्हता.


अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (डीआरडीओ) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.


अब्दुल कलाम यांची विचारर्श्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काही तरी नविन आणि मोठ करण्याचे उद्देश्य आपल्या मनाशी बाळगत असत.


त्यांनी आपल्या वैज्ञानिक्तेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर चे डिजाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता.


“संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) येथे काही काळ नौकरी केल्यानंतर ते “इंडियन कमेटी फॉर स्पेस रिसर्च” चे सदस्य सुद्धा राहिले होते.


यानंतर १९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन असलेल्या “भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन” (ISRO) सोबत जुळले होते.


१९६२ पासून १९८२ च्या कालावधी पर्यंत ते इस्रो सोबत जुळलेले होते, या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची पदे सांभाळली होती.


अब्दुल कलाम यांना भारताच्या सेटैलाइट लॉन्च व्हीकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.


अब्दुल कलाम हे त्याठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर च्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतात आपले पहिले “स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV3” तयार केले होते. यानंतर या यानाला १९८० मध्ये पृथ्वीच्या कक्षे जवळ स्थानापन केले होते.


अब्दुल कलाम यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या “अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लब” चे सदस्य बनविण्यात आले.


विलक्षण प्रतिभावंतांचे धनी असणारे अब्दुल कलाम यांनी “स्वदेशी गाईडेड मिसाईल” चे डिजाईन तयार केले होते. या डिजाईन साठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता.


स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापरत करून त्यांनी अग्नी आणि पुर्थ्वी सारख्या मिसाईल तयार करून, त्यांनी फक्त विज्ञान क्षेत्रांतच आपले महत्वपूर्ण योगदानच नाही दिले तर, त्यांनी भारत देशाला संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.


यानंतर  १९९२ पासून १९९९ च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती. त्यावेळेला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते.


याचदरम्यान अब्दुल कलाम यांच्या निर्देषणात दुसऱ्यांदा राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी अणूच्या यशस्वीपणे चाचण्या घेण्यात आल्या होत्या.


अश्यातऱ्हेने भारत देश अण्वस्त्र निर्मिती करणारा, अणुशक्ती संपन्न आणि समृद्ध देश बनला.


भारताच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदावर कार्य केलेल्या अब्दुल कलामांनी   भारतातील वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उन्नती आणि विकासाकरता विजन २०२० दिले आहे(होते).


डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना १९८२ साली ”डीफेन्स रिसर्च डेवलपमेंट लेबोरेट्री”(DRDL) चे संचालक बनविण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना “अन्ना युनिवर्सिटी ” तर्फे डॉक्टर ही पदवी देऊन गौरविण्यात आले होत.


अब्दुल कलाम यांनी डॉ. वी.एस. अरुणाचलम यांच्या बरोबर इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेवलपमेंट(IGMDP) च्या कार्यक्रमाची योजना तयार केली होती.


याशिवाय अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वदेशी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यासाठी एक संघटना तयार करण्यात आली होती.  त्याचठिकाणी सर्वात पहिले मध्यम आणि मर्यादित ठिकाणापर्यंत मार करणारे क्षेपणास्त्रे बनवण्यावर जोर देण्यात आला.


यानंतर जमिनीवरून हवेत वार करणारे टैंकभेदी मिसाईल आणि रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च वेहकिल(रेक्स) बनवण्यावर जोर देण्यात आला होता.


दूरदृष्टी विचारशैलीचे व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलामांच्या नेतुत्वात सण १९८८ साली पृथ्वी, सण १९८५ मध्ये त्रिशूल आणि सण १९८८ मध्ये “अग्नी” क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली होती.


तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेत आकाश, नाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती.


अब्दुल कलाम यांनी रशियाच्या संगतीने सण 1998  साली भारताने ब्रम्होस प्राइवेट लिमिटेड ची स्थापना करून, सुपरसोनिक क्रूज मिसाइल वर काम करण्यास सुरवात केली होती.


ब्रम्होस क्षेपणास्त्रा बद्दल सांगायचे म्हणजे हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश, आणि समुद्र या तिन्ही ठिकाणी मारा करू शकते. याच वर्षी अब्दुल कलाम यांनी हृदय चिकीत्सक सोमा राजू यांच्या सोबत मिळून एक स्वस्त “कोरोनरी स्टेंट”  चा विकास केला, ज्याला “कलाम-राजू स्टेंट”  हे नाव देण्यात आले.


अब्दुल कलाम यांनी विज्ञान क्षेतात दिले असलेले आपले महत्वपूर्ण योगदान आणि त्यात त्यांना मिळालेल्या यशा बद्दल आज त्यांचे नाव जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये मोजले लागले.


आज त्यांची ख्याति “मिसाइल मॅन”  च्या रुपाने जगाच्या चोहोदीशांना पसरलेली आहे.


त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिल्या असलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना भरपूर  मोठ मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम – APJ  Abdul as President


भारताचे “मिसाइल मॅन”  म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या “अग्नी” क्षेपणास्त्राला उडान दिले होते. तसेच त्यांनी भारताला “अणु शक्ती” च्या बाबतीत एक संपन्न राष्ट बनविले.


विज्ञान आणि भारतीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते


की, राजनीतिक जगतात त्यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली होती.


अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सण २००२ साली NDA च्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होतं, आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचा कुठल्याच प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला.

अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते, ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. त्याचप्रमाणे ते देशातील पहिले असे वैज्ञानिक होते जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले.


भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली.


देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या व्यक्तींपैकी अब्दुल कलाम तिसरे असे राष्ट्रपती होते, ज्यांना राष्ट्रपती पद स्वीकारण्याआधीच भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान “भारत रत्न” देऊन सन्मानित करण्यात आल होतं.


त्यांच्या आधी हा पुरस्कार डॉ. जाकिर हुसैन आणि डॉ. राधाकृष्णन यांना त्यांच्या राष्ट्रपती बनण्याआधीच देऊन सन्मानित करण्यात आल होतं.


अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असतांना सुद्धा लोकांना भेटत असत. सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूपच भाव होता त्यामुळे ते लोकांच्या समस्ये बाबत नेहमी तत्पर राहत होते.


आपल्या या लाडक्या राष्ट्रपतींना जेव्हा देशातील नागरिक पत्र पाठवीत असत,  त्यावेळेला ते स्वत: त्या पत्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या हातांनी पत्र लिखाण करीत असत.


याच कारणामुळे ते देशाच्या जनतेत लोकप्रिय होते, आणि त्यांना “लोकांचे राष्ट्रपती” (पीपुल्स प्रेसिडेंट) देखील म्हटल्या जात होतं.


अब्दुल कलाम यांच्या मतानुसार, राष्ट्रपती पदावर असतांना त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयातील सर्वात कठीण निर्णय होता तो …….


अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर असतांना त्यांनी २००१ साली संसदेवर हल्ला करणाऱ्या मध्ये दोषी ठरलेल्या कश्मीरी आतंकवादी अफजल गुरु सोबतच २१ लोकांनी दयेची याचिका त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.


परंतु त्यांनी २१ पैकी फक्त एकाच याचिकेवर दया दाखवल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे अकरावे तेसच राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणारे पहिले व्यक्ती होते.


भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केल्या असलेल्या उत्कृष्ट कामगिरींमुळे भारत देश आज सुद्धा त्याचं स्मरण करीत असतो.


भारतातील जनतेच्या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे. तसेच  भरतीय जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे एयरोस्पेस वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताला एक नविन दिशा दाखवली होती.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी ”अग्नी” मिसाईल चे उडाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली होती.


याच करणामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते.  अब्दुल कलाम हे खूप दूरदृष्टीचा विचार करणारे महान वैज्ञानिक होते, तसेच त्यांचे व्यक्तिमत्व खूपच महान होत.



अश्या प्रकारे त्यांनी कठिण परिस्थिती असतांना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेऊन काही कालावधी नंतर,  अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली.


अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते. ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच सबंध नव्हता.


अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (डीआरडीओ) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.


अब्दुल कलाम यांची विचारर्श्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काही तरी नविन आणि मोठ करण्याचे उद्देश्य आपल्या मनाशी बाळगत असत.


त्यांनी आपल्या वैज्ञानिक्तेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर चे डिजाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता.


“संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) येथे काही काळ नौकरी केल्यानंतर ते “इंडियन कमेटी फॉर स्पेस रिसर्च” चे सदस्य सुद्धा राहिले होते.


यानंतर १९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन असलेल्या “भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन” (ISRO) सोबत जुळले होते.


१९६२ पासून १९८२ च्या कालावधी पर्यंत ते इस्रो सोबत जुळलेले होते, या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची पडे सांभाळली होती.


अब्दुल कलाम यांना भारताच्या सेटैलाइट लॉन्च व्हीकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.


अब्दुल कलाम हे त्याठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर च्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतात आपले पहिले “स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV3” तयार केले होते. यानंतर या यानाला १९८० मध्ये पृथ्वीच्या कक्षे जवळ स्थानापन केले होते.


अब्दुल कलाम यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या “अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लब” चे सदस्य बनविण्यात आले.


विलक्षण प्रतिभावंतांचे धनी असणारे अब्दुल कलाम यांनी “स्वदेशी गाईडेड मिसाईल” चे डिजाईन तयार केले होते. या डिजाईन साठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता.


स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापरत करून त्यांनी अग्नी आणि पुर्थ्वी सारख्या मिसाईल तयार करून, त्यांनी फक्त विज्ञान क्षेत्रांतच आपले महत्वपूर्ण योगदानच नाही दिले तर, त्यांनी भारत देशाला संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.


यानंतर  १९९२ पासून १९९९ च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती. त्यावेळेला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते.


याचदरम्यान अब्दुल कलाम यांच्या निर्देषणात दुसऱ्यांदा राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी अणूच्या यशस्वीपणे चाचण्या घेण्यात आल्या होत्या.


अश्यातऱ्हेने भारत देश अण्वस्त्र निर्मिती करणारा, अणुशक्ती संपन्न आणि समृद्ध देश बनला.


भारताच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदावर कार्य केलेल्या अब्दुल कलामांनी   भारतातील वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उन्नती आणि विकासाकरता विजन २०२० दिले आहे(होते).


डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना १९८२ साली ”डीफेन्स रिसर्च डेवलपमेंट लेबोरेट्री”(DRDL) चे संचालक बनविण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना “अन्ना युनिवर्सिटी ” तर्फे डॉक्टर ही पदवी देऊन गौरविण्यात आले होत.


अब्दुल कलाम यांनी डॉ. वी.एस. अरुणाचलम यांच्या बरोबर इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेवलपमेंट(IGMDP) च्या कार्यक्रमाची योजना तयार केली होती.


याशिवाय अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वदेशी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यासाठी एक संघटना तयार करण्यात आली होती.  त्याचठिकाणी सर्वात पहिले मध्यम आणि मर्यादित ठिकाणापर्यंत मार करणारे क्षेपणास्त्रे बनवण्यावर जोर देण्यात आला.


यानंतर जमिनीवरून हवेत वार करणारे टैंकभेदी मिसाईल आणि रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च वेहकिल(रेक्स) बनवण्यावर जोर देण्यात आला होता.


दूरदृष्टी विचारशैलीचे व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलामांच्या नेतुत्वात सण १९८८ साली पृथ्वी, सण १९८५ मध्ये त्रिशूल आणि सण १९८८ मध्ये “अग्नी” क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली होती.


तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेत आकाश, नाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती.


अब्दुल कलाम यांनी रशियाच्या संगतीने सण 1998  साली भारताने ब्रम्होस प्राइवेट लिमिटेड ची स्थापना करून, सुपरसोनिक क्रूज मिसाइल वर काम करण्यास सुरवात केली होती.


ब्रम्होस क्षेपणास्त्रा बद्दल सांगायचे म्हणजे हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश, आणि समुद्र या तिन्ही ठिकाणी मारा करू शकते. याच वर्षी अब्दुल कलाम यांनी हृदय चिकीत्सक सोमा राजू यांच्या सोबत मिळून एक स्वस्त “कोरोनरी स्टेंट”  चा विकास केला, ज्याला “कलाम-राजू स्टेंट”  हे नाव देण्यात आले.


अब्दुल कलाम यांनी विज्ञान क्षेतात दिले असलेले आपले महत्वपूर्ण योगदान आणि त्यात त्यांना मिळालेल्या यशा बद्दल आज त्यांचे नाव जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये मोजले लागले.


आज त्यांची ख्याति “मिसाइल मॅन”  च्या रुपाने जगाच्या चोहोदीशांना पसरलेली आहे.


त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिल्या असलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना भरपूर  मोठ मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम – APJ  Abdul as President


भारताचे “मिसाइल मॅन”  म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या “अग्नी” क्षेपणास्त्राला उडान दिले होते. तसेच त्यांनी भारताला “अणु शक्ती” च्या बाबतीत एक संपन्न राष्ट बनविले.


विज्ञान आणि भारतीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते


की, राजनीतिक जगतात त्यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली होती.


अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सण २००२ साली NDA च्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होतं, आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचा कुठल्याच प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला.


अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती पदाच्या विरोधात लक्ष्मी सहगल उभ्या होत्या, आणि अब्दुल कलाम यांनी त्यांचा भरपूर मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. त्यांनी सण २००२ साली भारताचे 11 राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.


अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते, ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. त्याचप्रमाणे ते देशातील पहिले असे वैज्ञानिक होते जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले.


भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली.


देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या व्यक्तींपैकी अब्दुल कलाम तिसरे असे राष्ट्रपती होते, ज्यांना राष्ट्रपती पद स्वीकारण्याआधीच भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान “भारत रत्न” देऊन सन्मानित करण्यात आल होतं.


त्यांच्या आधी हा पुरस्कार डॉ. जाकिर हुसैन आणि डॉ. राधाकृष्णन यांना त्यांच्या राष्ट्रपती बनण्याआधीच देऊन सन्मानित करण्यात आल होतं.


अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असतांना सुद्धा लोकांना भेटत असत. सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूपच भाव होता त्यामुळे ते लोकांच्या समस्ये बाबत नेहमी तत्पर राहत होते.


आपल्या या लाडक्या राष्ट्रपतींना जेव्हा देशातील नागरिक पत्र पाठवीत असत,  त्यावेळेला ते स्वत: त्या पत्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या हातांनी पत्र लिखाण करीत असत.


याच कारणामुळे ते देशाच्या जनतेत लोकप्रिय होते, आणि त्यांना “लोकांचे राष्ट्रपती” (पीपुल्स प्रेसिडेंट) देखील म्हटल्या जात होतं.


अब्दुल कलाम यांच्या मतानुसार, राष्ट्रपती पदावर असतांना त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयातील सर्वात कठीण निर्णय होता तो …….


अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर असतांना त्यांनी २००१ साली संसदेवर हल्ला करणाऱ्या मध्ये दोषी ठरलेल्या कश्मीरी आतंकवादी अफजल गुरु सोबतच २१ लोकांनी दयेची याचिका त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.


परंतु त्यांनी २१ पैकी फक्त एकाच याचिकेवर दया दाखवल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.


राष्ट्रपती पद सोडल्यानंतरचा प्रवास – APJ Abdul Kalam after President


भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे डॉ. अब्दुल कलाम यांनी भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून पाच वर्ष कार्यभार सांभाळला होता.  देशाच्या प्रती आपली सेवा देऊन सुद्धा ते आपल्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिले.


राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी  अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा यासारख्या कामांमध्ये त्यांनी  मोठ्या जोमाने आणि प्रामाणिकपणाने कार्य केले.


अब्दुल कलाम यांनी गेस्ट प्राध्यापक म्हणून बऱ्याच इन्स्टिट्यूट मध्ये आपले योगदान दिल होतं, जसे की, ते अतिथी प्राध्यापक म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलांग, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यासारख्या संस्थेशी संबंधित ते जुडले गेले होते.


अब्दुल कलाम यांनी प्राध्यापक असतांना आयआयटी हैदराबाद, अण्णा विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) येथेही त्यांनी माहिती तंत्रज्ञान शिकवले.


या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थानचे सहकारी म्हणून देखील काम केल होतं.


तिरुअनंतपुरम मधील भारतीय अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञान चे कुलगुरू पद सुद्धा त्यांनी सांभाळल होतं.


तसेच चेन्नई येथील अण्णा विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून  जीवनाच्या शेवटच्या क्षणा  पर्यंत काम करत राहिले.


अब्दुल कलाम यांचे विचार खूपच प्रभाशाली होते, त्यांची आपल्या देशाबद्दल असणारी विचारशैली नेहमी सकारात्मक होती.


ते आपल्या देशाच्या विकास आणि प्रगती बद्दल विचार करणारे महान व्यक्ती होते.


अब्दुल कलाम यांनी आपल्या देशातील तरुणांचे भविष्य उज्वल करिता आणि आपला भारत देश भ्रष्टाचारमुक्त बनवा या उद्देश्याने त्यांनी “व्हाट कैन आई गिव”(“मी काय देऊ शकतो”) हा उपक्रम राबवला होता.


अब्दुल कलाम यांनी देशातील जनतेच्या मनात स्वत:  बद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली होती. अश्या या महान नेत्याला आपल्या देशातील विद्यार्थ्यान प्रती खूपच आकर्षण होतं.


अश्या या महान नेत्याची आपल्या देशातील विध्यार्थ्यान प्रती असणारी आपुलकीची भावना पाहून अब्दुल कलाम यांना त्यांच्या या स्वभावाबद्दल  संयुक्त राष्ट्रानेही त्यांचा वाढदिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके – APJ Abdul Kalam Books


भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळविणारे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी खूप मोठ योगदान दिल आहे.  ते एका महान वैज्ञानिका बरोबर एक कुशल राजनेता देखील होते.


अब्दुल कलाम हे प्रख्यात अध्यापका सोबतच एक महान लेखक सुद्धा होते. कलाम साहेबांना सुरवातीपासूनच लिखाण करण्याची खूप आवड होती. त्यांनी लिहिल्या असलेल्या काही पुस्तकांबद्दल आम्ही आपणाला सागणार आहोत जी खालील प्रमाणे आहेत-


‘इंडिया २०२०: अ विजन फॉर द न्यू मिलिनियम’,


‘इग्नाइटेड माइंडस: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया’,


‘विंग्स ऑफ़ फायर: ऐन ऑटोबायोग्राफी’,


‘इंडोमिटेबल स्पिरिट’


‘मिशन इंडिया’


एडवांटेज इंडिया


”यू आर बोर्न टू ब्लॉसम”


‘इन्सपायरिंग थोट्स’


”माय जर्नी”


”द ल्यूमिनस स्पार्क्स”


रेइगनिटेड


अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे कर्तुत्व – APJ Abdul Kalam Awards


अब्दुल कलाम यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान दिल आहे. त्यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच महत्वपूर्ण योगदान दिल आहे. यामुळेच त्यांना देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या “भारत रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आल होतं.


या पुरस्कारा बरोबर त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कारा सारख्या अनेक पुस्काराने सन्मानित केल गेल आहे.


याव्यतिरिक्त अब्दुल कलाम यांना जगातील ३५ पेक्षा जास्त विध्यापिठांनी डॉक्टरेट पदवी(मानद)  देऊन त्यांना गौरविण्यात आल आहे.


डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे आहे:-


अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार:-


पुरस्कार मिळण्याचे वर्ष                   पुरस्कार


वर्ष १९९७  – भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न देऊन गौरविण्यात आलं.


वर्ष १९९० – भारत सरकार मार्फत पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.


वर्ष १९८१ – भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरविल.


वर्ष २०११ – IEEE होनोअरी मेंबरशिप(मानद सदस्यता)


वर्ष १९९७ – इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


वर्ष १९९८  – भारत सरकार तर्फे वीर सावरकर पुरस्कार देण्यात आला.


वर्ष २००० – अलवर रिसर्च सेंटर, चेन्नईतर्फे रामानुजन पुरस्कार देण्यात आला.


वर्ष २०१५ – संयुक्त राष्ट्र संघाने कलाम जी यांची जयंती “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून मान्य केली.


अब्दुल कलाम यांनी आपल्या साधेपणा आणि दयाळूपणाच्या स्वभावामुळे देशातील जनतेच्या मनात स्वत: बद्दल आपुलकीची भावना निर्माण केली होती.


“मिसाईल मॅन” म्हणून ख्याती मिळविणारे एक महान नेता, महान वैज्ञानिक, तसेच आध्यापका बरोबर एक प्रख्यात लेखक म्हणून सुद्धा अब्दुल कलाम यांनी आपल्या सकारात्मक विचारांची छाप देशातील जनतेत सोडली होती.


अश्या तऱ्हेच्या वेगवेगळया भूमिका पार पडणाऱ्या अब्दुल कलाम यांचा स्वभाव खूपच साधा आणि सरळ होता.


त्यांच्या कामात ते कधीच दिर्घाई करत नसत, आपल्या कामाप्रती ते खूप बारकाईने विचार करून ते काम पूर्ण करीत असत.


अब्दुल कलाम यांची सुरवातीची परिस्थिती खूपच हलाकीची होती, त्यामुळे त्यांना बऱ्याच मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.


ते आलेल्या परीस्थीशी मोठ्या जिद्दीने संघर्ष करीत राहिले.  अब्दुल कलाम यांनी आपल्या मनाशी बाळगलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे समोर जात राहिले.


अश्याप्रकारे त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करत देशाचे एक महान वैज्ञानिक आणि पहिले राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे पहिले राष्ट्रपती बनले होते. ते देशातील सर्व जनतेसाठी एक प्रेरणादायी बनले होते.


आपल्या देशातील पहिल्या अग्नी क्षेपणास्त्राला उडण देणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक बनले होते. त्यांच्या अंगी असणाऱ्या महान विचार शैली आणि स्पष्टवक्तेपणा मुळे ते प्रत्येकांना मंत्रमुग्ध करत असत.


त्यांचे विचार नवयुवकांनच्या मनात काही नविन करण्यासाठी उत्साह निर्माण करतात.


अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टी विचारशैली च्या बद्दल आपल्याला अंदाज घ्यायचा असल्यास आपल्याला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे आणि विचारांचे वाचन केल्यानंतरच समजू शकतो.


अब्दुल कलाम यांना अस म्हणायचं होत की- 


“स्वप्न ते नाहीत जे तुम्ही झोपेत असतांना पाहता, तर स्वप्न ही अशी असायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला झोपच आली नाही पहिजे”.


याव्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी दिले असलेले सकारात्मक विचार आहेत जी नवयुवकांच्या मनात जीवनात समोर जाण्यास त्यांना उत्साह निर्माण करतात आणि आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात.


अब्दुल कलाम याचे महान विचार- APJ Abdul Kalam Thoughts


“आपण करत असलेल्या कामात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न करणे कधीच थांबू नका”. या ठिकाणी FAIL ( अपयश) चा अर्थ होतो- First Attempt in Learning.


आपल्याला मिळालेल्या पहिल्या यशा नंतर आराम करण्याबाबत कधीच विचार करू नका. कारण यानंतर जर आपल्याला अपयश मिळाले तर सर्व लोक हेच म्हणतील की याच्या पहिले मिळालेले यश हे नशिबाने मिळाले असेल.


सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टी बद्दल वेगवेगळ्याप्रकारे विचार करणे.


जर आपणास सूर्या सारखे चमकायचे असेल तर पहिले त्याच्यासारखं जळाव लागेल.


आपण आपल्या आयुष्यात हार कधीच नाही पत्कारली पहिजे, आणि जीवनात येणाऱ्या समस्यांन समोर कधीच हरू नका.


कोणतेही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास असणे आवश्यक आहे, मग ते माउंट एवरेस्ट चे शिखर असो किंवा आपल्या व्यवसायाचे.



आपल्या भारत देशाला “अणुशक्ती संपन्न” बनवणारे अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांन सोबत वेळ घालवणे खूप आवडत असे.


प्रत्येक वेळेस त्यांनी एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले.

Saturday, October 10, 2020

पक्षाच्या चित्रांवर क्लिक करा आवाज ऐका

 खालील लिंकवरील चित्रांमधील कुठल्याही पक्षाला हात लावा .. त्याचा आवाज आपल्याला एैकता येईल. पक्षी मोठा करुन स्पष्ट पहाता येईल.. तसेच विविध प्राणी ,वनस्पती, मासे यांचीही माहिती तुम्हाला मिळेल.

Wednesday, September 30, 2020

महात्मा गांधी

 महात्मा गांधी




            (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्‍भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.

       कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले, तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धुम्रपान, वेश्यागमन इ. गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखविण्याचा प्रयत्‍न केला. ते त्यात काही काळ फसलेही. परंतु तीव्र पश्चात्ताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. १८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

         १८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले, की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्‍लंडला पाठवावे. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्‍लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले.मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठविण्यास नाखूष होती. परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते १८८८ मध्ये इंग्‍लंडला गेले. या वेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्‍लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्‍लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबलयांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.

          ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झालेच होते. स्वदेशी परतले. मातेचे निधन झाले होते, ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली. वडीलभावाने परदेशगमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेवविले.


फ्रिकेतील सत्याग्रहसंग्रामाचे प्रथम पर्व



          भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्‍जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले. दरबानचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर ४०,००० पौडांची फिर्याद केली होती. गांधींनी त्या दोघांचे मन वळवून कज्‍जाचा निकाल सामोपचाराने करवून घेतला. आफ्रिकेत सु. २० वर्षे गांधी राहिले. वकिलीचा अनुभव घेतला. दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून, कज्‍जाचा निकाल करणे यात गांधी तरबेज झाले. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगो ऱ्या जमातींवरील विशेषतः हिंदी लोकांवरील, त्याचप्रमाणे तेथील मजुरांवरील होणा ऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमांविरुद्ध आपल्या सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकालपर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांनी साधली. तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इ. जमातींची व दलित जनांची अंतःकरणे काबीज केली. अनेक यूरोपीय मित्रही मिळविले.

         दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्या वेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या तीन स्वतंत्र राज्यांत हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदू मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्येने नेले जात होते. हिंदी व्यापारीही तेथे व्यापाराकरिता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगो ऱ्या लोकांना निग्रोंप्रमाणेच वागवीत असत; सर्वांनाच कुली म्हणत. गोऱ्या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले, तर गोरे लोक व  पोलीस मारहाण करीत; बुटाने तुडवीत.


               गांधींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्या वेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबिली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असे; त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरूद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास १८९६ च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. १९०३ साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरूद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला १९०७ मध्ये उग्र रूप आले. १९०८ मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधींनाही सक्तमजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्‍लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. १९१२ साली गोपाळकृष्ण गोखले हे जनरल स्मट्‌सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्‍नेह जमला. गोखले यांस गांधींनी आपले राजकीय गुरू म्हणून अत्यंत पूज्य मानले. १८ डिसेंबर १९१३ रोजी गांधींना स्मट्सने बंधमुक्त केले व २१ जानेवारी १९१४ रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली.

फ्रिकेतील त्यांच्या वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी रस्किनचे अनटू धिस लास्ट, टॉलस्टायचे किंग्डम ऑफ गॉड व थोरोचे निबंध वाचले. रस्किनच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबान शहराजवळ सु. चाळीस हे. जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधी स्वतः शेतकाम करीत, छापखान्यात यंत्रेही फिरवीत. नंतर त्यांनी जोहॅनिसबर्गजवळ सु. ४४० हे. जागेत टॉलस्टाय फार्म स्थापिला. १९१३ मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी येथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी १९०८ साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तररूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे, हा विचार त्यांनी मांडला.

भारतातील सार्वजनिक जीवन


                         

       गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्‍लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापा ऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली. परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीतज्ञ खरे गुरूजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे. बी. कृपलानी, किशोरलाल मश्नुवाला, प्यारेलाल इ. गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या                   आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला.


              हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ ४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाला; त्या सभेत व्हाइसरॉय लॉर्ड हर्डिंग, अॅनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहि ऱ्यालाही दिपवून टाकणाऱ्या जडजवाहिरांनी मंडित राजेमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर, डोळे दिपविणारे जडजवाहिर राजेमहाराजांपाशी आहेत, तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्याची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत’. अशा अर्थाचे भाषण चालू असताना अॅनी बेझंट यांनी गांधींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली.

गांधींनी १९१७ मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. या वेळी राजेंद्रप्रसाद, ब्रिजकिशोर, मझरूल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील ८५० खेड्यांतील सु. ८,००० शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. १३ जून १९१७ रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले.

चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधींजींचे भारतीय नेतृत्त्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंज्या पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा सत्तर टक्के बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सु. ८०,००० मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. बावीस दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकविण्यासाठी उपोषण केले. तीन दिवसांत यश आले. मालकांनी ३५ % पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजुर-महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार, चार आणेच पीक येऊन देखील, शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली, म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला.

पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून १९१७ साली व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्यभरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते, की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकारांचे आश्वासन मिळाले, तरच सैन्यभरतीला पाठिंबा द्यावा. गांधींनी बिनशर्तच पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधींचा व दीनबंधू सी. एफ्. अँड्रूज या ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा स्‍नेह जमला होता. ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधला अँड्रूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्यभरतीच्या प्रचाराकरिता देशभर फिरत असता गांधींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक तापही सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्‍नेहसंबंध वाढू लागला होता. वल्लभभाई अहमदाबादला गांधींना भेटावयास आले. वल्लभभाईंनी औषधोपचार घ्यावा, असा त्यांना आग्रह केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानुगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषधे व इंजेक्शन्स घेण्याचा आग्रह केला. गांधींनी तो नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधींना वाटू लागले, की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाईंनी पुन्हा डॉ. कानुगांना प्रकृती तपासण्यास बोलाविले, त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही, अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्‍जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपाय उपयोगी पडला; सर्व शरीराला बर्फाचा लेप केला होता. गांधी या आजारातून बाहेर पडले. निसर्गोपचारावर त्यांची फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी                                                 

                                                                                                                            पडले, तरी उपवास व निसर्गोपचार यांवरच ते भर        देत.

र्मनांचा पराभव होऊन पहिले जागतिक युद्ध १९१८ साली संपले; ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संपप्त झाले. ब्रिटिश सरकारने माँटेग्यू-चेम्सफर्ड समिती भारताच्या राजकीय हक्कांसंबंधी शिफारशी करण्याकरिता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदेमंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले; परंतु गव्हर्नरांचे व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरत होता. तो दाबून टाकण्याकरिता न्यायमूर्ती रौलट याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. ६ एप्रिल १९१९ रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठविले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला हत्याकांडामुळे गांधींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला. काँग्रेसने पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादिकांची पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचारांच्या चौकशीकरिता १४ ऑक्टोबर १९२१ रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली पाच गोरे व तीन हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधींचीही साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला, की लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते; परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले, अशी कबुली हंटर समितीने दिली. १९२० साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले; त्यात असहकारितेचे आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनरुज्‍जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फे ऱ्या निघू लागल्या. कायदेमंडळांवर देशातील शेकडो प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापण्यात आल्या. परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधींनी या अनत्याचारी असहकारितेची शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प सोडला. बार्डोली तालुक्यात ही चळवळ सुरू करावयाचे ठरविले. गांधींनी बार्डोली येथेच आपला मुक्काम ठेवला. परंतु उत्तर प्रदेशात चौरीचौरा येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बार्डोली येथे ११ व १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बैठक बोलावून बार्डोलीचा सत्याग्रह तहकूब ठेवला. महात्मा गांधींना त्यानंतर १० मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले: ब्रिटिश राज्यपद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रीती उत्पन्न केली नाही, तर ब्रिटिशांच्या राज्यपद्धतीविषयी अप्रीती उत्पन्न केली आहे. अशी अप्रीती उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्‍गुणाचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रुमफील्ड यांनी निकाल देताना सांगितले: तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे. परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्‍न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले; म्हणून तुम्हास मोठ्या खेदाने मला शिक्षा सुनवावी लागत आहे. सहा वर्षांच्या साध्या कैदेची शिक्षा मी फर्मावितो. येरवडा जेलमध्ये गांधींना रवाना केले. तेथे १९२४ साली त्यांचा आंत्रपुच्छशोथ हा विकार बळावला; त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर गांधींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढा न करता, सामाजिक सुधारणांसारख्या विधायक कार्यक्रमास वाहून घेतले. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल इ. काँग्रेस नेत्यांनी स्वराज्य पक्ष स्थापून कायदेमंडळात स्वराज्याच्या हक्कांकरिता झगडायचे ठरविले. हिंदु-मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण, खादीग्रामोद्योग, गावसफाई इ. कार्यक्रम गांधींनी हाती घेतले. गांधींनी देशभर प्रवास करून प्रचार केला.       राजगोपालाचारी, जवाहरलाल नेहरू हे गांधींच्याच विधायक कार्यक्रमात सहकार्य करू लागले आणि गांधींच्या कार्यक्रमाचे ते समर्थक बनले. काँग्रेसमधील एम्. आर्. जयकर, न. चिं. केळकर, मदनमोहन मालवीय इ. मंडळी, मुसलमानांचे मन वळविणे अशक्य आहे, असे म्हणून हिंदू महासभेकडे वळली. काँग्रेसमधील अनेक मुसलमान नेते, बॅ. जिना, सर अली इमाम यांनी डिसेंबर १९२५ मध्ये अलीगढ येथे मुस्लिम लीगचे अधिवेशन भरवून मुसलमानांची फळी उभी केली. भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांतांच्या विधिमंडळांत शिरलेल्या स्वराज्य पक्षाच्या द्वारे वारंवार प्रकट होऊ लागला; हे पाहून नवे आंदोलन उद्‍भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वयंनिर्णयाचे हक्क वाढवावे, म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरविले. ३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन आयोग मुंबई बंदरात उतरला. तेव्हापासून त्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिशविरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. लाहोरला लाला लजपतराय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठीहल्ला झाला. लाला लजपतराय या लाठीहल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले, हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर करण्याचे ठरविले. गांधी साम्राज्यांतर्गत स्वराज्याचे समर्थक होते. या दोघांना त्यांनी आश्वासन दिले, की ३१ डिसेंबर १९२९ पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळाले नाही, तर मी संपूर्ण स्वातंत्र्यवाला होईन. त्याच सुमारास भगतसिंग इ. सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बाँबस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरिता गांधींनी १९३० साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. १२ मार्च १९३० रोजी सकाळी ६·३० वाजता साबरमती आश्रमातून गांधींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही; अशी प्रतिज्ञा करून समुद्र किना ऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता ७२ सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. ६ एप्रिलला यात्रा संपली. गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ४ मे १९३० रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली; येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली.           देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. २५ जानेवारी १९३१ रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी सुरू होऊन ५ मार्च १९३१ रोजी ⇨गांधीआयर्विन करार झाला. भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडविण्याकरिता इंग्‍लंडमध्ये नोव्हेंबर १९३१ मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. गांधी त्या परिषदेस उपस्थित राहिले. इंग्‍लंडमध्ये त्या वेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वहाणा असा त्यांचा पोषाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधींनी सांगितले, की ब्रिटिश प्रजाजन म्हणविण्यात मला एके काळी अभिमान वाटत होता; आता बंडखोर म्हणून घेणे मला जास्त आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य यांना विभक्त मतदार संघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरिता प्राण गेले तरी चालतील, असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर ३ जानेवारी १९३१ रोजी गांधींना अटक झाली. त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्रबाबू, सुभाषचंद्र बोस, डॉ. अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इ. राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. १८ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉ. भी. रा. ऊर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी २० प्‍टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉ. आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख २६ रोजी गांधींचा जीव वाचविण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी तडजोड केली व येरवडा करार झाला. ८ मे १९३३ पासून त्यांनी पापाचे प्रायश्चित म्हणून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यांची लगेच मुक्तता केली. १२ जुलै १९३३ रोजी गांधींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले; परंतु त्यांनी १९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४ मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली. गांधींनी शेट जमनालाल बजाज या आपल्या एका थोर अनुयायाच्या सांगण्यावरून वर्धा येथील सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. तेथे ते अखेरपर्यंत राहिले आणि विधायक कार्यक्रमाला पुन्हा त्यांनी वाहून घेतले. त्यांनी १९३८ मध्ये बंगालचा दौरा केला. बंगाल हे सशस्त्र क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते           . शेकडो सशस्त्र क्रांतिकारक कारावासात खितपत पडले होते. त्यांना ब्रिटिश सत्ताधाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी बंधमुक्त केले. प्रांतिक व केंद्रीय निवडणुकींत १९३७ मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतांमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. सात प्रांतांमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांचे राज्य झाले होते. दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. युद्धसहकार्य नाकारून गांधींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. बॅ. जिनांच्या सल्ल्यानुसार मुस्लिम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे देशभर मुक्तिदिन साजरा केला. १९४१ च्या एप्रिलमध्ये गांधींनी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी व युद्धप्रयत्‍नाससाहाय्य व्हावे, म्हणून ११ मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळांने ठरवून सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठविला. गांधीप्रभृती नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या; परंतु त्या अखेर फिसकटल्या. याचे कारण गांधींना युद्धसहकार्य करायचे नव्हते. गांधींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धारंभीचे धोरण नंतर बदलले होते. म्हणून त्या वेळचे व्हाइसरॉय वेव्हेल यांनी गांधी शब्दाचे पक्के नव्हते, अशा अर्थाचे विधान या संदर्भात केले असावे. गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलाविली. त्या बैठकीत त्यांनी भारत स्वतंत्र झाला आहे, असा निर्णय जाहीर केला आणि छोडो भारत आंदोलन देशभर सुरू केले. गांधींनी लोकांना सांगितले, की करा किंवा मरा. ९ ऑगस्ट रोजी गांधींसह शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. गांधींना पुणे येथील आगाखान बंगल्यात स्थानबद्ध केले. त्यांच्याजवळ कस्तुरबा, महादेव देसाई, डॉ. गिल्डर, डॉ. सुशील नायर, सरोजिनी नायडू इत्यादींना ठेवले. महादेव देसाई हे गांधींचे चिटणीस. त्यांना तेथेच मृत्यू आला. गांधींच्या पत्‍नी कस्तुरबा ह्या हृदयविकाराने आजारी होत्या. २२ फेब्रुवारी १९४३ रोजी त्यांना मृत्यू आला.  या अत्यंत प्रियजनांचा वियोग गांधींनी मोठ्या धैर्याने सहन केला. कस्तुरबांनी गांधींबरोबर मोठ्या निष्ठेने आदर्श पतिव्रता म्हणून जीवन व्यतीत केले. ६ मे १९४४ साली गांधीजींची बिनशर्त मुक्तता झाली. २ ऑक्टोबर १९४४ रोजी एक कोटी बारा लाखांचा कस्तुरबा निधी सेवाग्राम येथे गांधींच्या स्वाधीन करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीचे जवाहरलाल नेहरूप्रभृती सभासद व अन्य नेते यांची जून १९४५ मध्ये कारागृहातून मुक्तता झाली. १९४६ मध्ये इंग्‍लंडमध्ये मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ अॅटली यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. त्यांनी मे १९४६ मध्ये भारताच्या स्वराज्याची योजना तयार केली. संविधान परिषद व हंगामी राष्ट्रीय मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार भारताला त्या योजनेप्रमाणे मिळाला२९ जुलै १९४६ रोजी मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीकरिता आंदोलन उभारले. भारताची फाळणी अपरिहार्य झाली. गांधींना ती मुळीच मान्य नव्हती. एक वेळ माझ्या देहाचे दोन तुकडे पडले तरी चालेल, पण भारताची फाळणी मी होऊ देणार नाही, असे गांधींनी जाहीर केले. परंतु ३ जून १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इ. नेत्यांनी भारताची फाळणी मान्य केली. या सुमारास हिंदु-मुसलमानांचे यादवी युद्ध देशभर पेटले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे स्वातंत्र्य जाहीर झाले. हिंदु-मुसलमानांच्या भयंकर कत्तली चालूच होत्या. गांधींनी दिल्लीतील वातावरण शांत होईपर्यंत उपोषण करण्याचे जाहीर केले. १३ जानेवारी १९४८ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. भारत सरकारने पाकिस्तानचे ५५ कोट रु. परत करावे, अशी गांधींची मागणी होती. ही मागणी वल्लभभाई प्रभृती नेत्यांना मान्य नव्हती; परंतु गांधींचा जीव वाचविण्याकरिता ती अखेर मान्य करावी लागली. १६ जानेवारी रोजी गांधींनी उपोषण सोडले. ३० जानेवारी १९४८चा दिवस उजाडला. काँग्रेसने सत्तेचा स्वीकार न करता जनतेच्या दारिद्याचे प्रश्न सोडवावेत, विधायक कार्यक्रमाला वाहून घ्यावे, म्हणून लोकसेवक संघ योजना गांधींनी तयार केली. ग्रामराज्य हा भारतीय स्वराज्याचा पाया बनावा, असे भारताच्या संविधानाचे तत्त्व तीत समाविष्ट केले. राष्ट्रीय मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद उद्‍भवले होते. गांधीजींनी सरदारांना पटविले, की ही फूट देशास अहितकारक आहे. संध्याकाळी पाच वाजले. बिर्ला भवनमधून गांधी प्रार्थनास्थानाकडे जावयास निघाले. प्रार्थनास्थानाकडे जातानाच पुण्याचे नथुराम गोडसे हे नारायण आपटे या साथीदारासह त्या प्रार्थनेच्या सभेत शिरले. गांधींच्या जवळ जाऊन प्रणाम करून नथुराम गोडसे यांनी गांधींच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गांधी ‘हे राम’ म्हणत धरणीवर पडले आणि गतप्राण झाले. भारतीय जनता दुःखसागरात बुडाली. जगातील मोठमोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, विज्ञानवेत्ते, कलाकार दुःखाने व्यथित झाले. सर्वश्रेष्ठ विज्ञानवेत्ते अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ही वार्ता कळल्याबरोबर उद्‍गार काढले, की असा महान माणूस या भूतलावर वावरत होता, याचेच आश्चर्य वाटते. अनेक तत्त्ववेत्त्यांनी म्हटले, की मानव जातीला पापातून मुक्त करणारा व शांततेचे मानवी विश्व भविष्यकाली निर्माण होईल, अशी आशा निर्माण करणारा हा माणूस होता. ‘राष्ट्रपिता’ म्हणून सर्वश्रेष्ठ अद्वितीय बहुमान गांधींना प्राप्त झाला.