manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Tuesday, June 30, 2020

संत तुकाराम


तुकाराम बोल्होबा अंबिले {मोरे} 


मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म : माघ शुद्ध ५, शके १५२८, (२२ जानेवारी १६०८ )
देहू, महाराष्ट्र

निर्वाण : फाल्गुन कृ.२ , शके १५७०, (१९ मार्च १६५०)
देहू, महाराष्ट्र

संप्रदाय : वारकरी 
संप्रदायगुरू : बाबाजी चैतन्य शिष्य संत निळोबा संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा

भाषा : मराठी

साहित्यरचना : तुकारामाची  गाथा (पाच हजारांवर अभंग)

कार्य:  समाज सुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू

व्यवसाय:  वाणी (ते शेती दुकानदारी व सावकारी करत )

वडील : बोल्होबा अंबिले

आई : कनकाई बोल्होबा आंबिले 

पत्नी : आवली

अपत्ये : महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) 

          हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.
         तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.
         भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
           संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.                .                समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. वि. का. राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे. संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लिहितात, "संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास हे होय" ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला आहे.
 
जीवन
                 तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते.
त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले (की आंबिले?) आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता.
                तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..
               तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.
सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
              देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केलाव मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.
             पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या  गाथा  इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.
              फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले.              कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.
              समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले.
संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.
                संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत.

संत नामदेव


              संत शिरोमणी नामदेव महाराज 

              (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; मृत्यू : ३ जुलै १३५०)

             हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा,नरसी नामदेव यागावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाडा मधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
             दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
             संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
               कीर्तनांत अनेक चांगल्या  ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
             भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.

नामदेवांसंबंधी आख्यायिका
नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला.
कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.

नामदेवांचे साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिले गेलेले साहित्य
घास घेई पांडुरंगा (कादंबरी, लेखक -रवींद्र भट)
चिरंतनाचा ज्ञानदीप : संत नामदेव (सुभाष कि. देशपांडे)
आद्य मराठी आत्मचरित्रकार-संत नामदेव (डॉ.सौ. सुहासिनी इर्लेकर)
नामदेव गाथा (संपादक : नाना महाराज साखरे)
नामदेव गाथा (संपादक: ह.श्री. शेणोलीकर)
संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित (डॉ. श्रीपाल सबनीस)
नामदेवांची गाथा (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन -एकूण २३३७ अभंग)
संत नामदेव गाथा (कानडे / नगरकर)
श्री नामदेव : चरित्र, काव्य आणि कार्य (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
श्री नामदेव चरित्र (वि.स. सुखटणकर गुरुजी-आळंदी)
श्री संत नामदेव महाराज चरित्र (प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत)
श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्त्वज्ञान (शंकर वामन दांडेकर)
श्री नामदेव चरित्र (वि.ग. कानिटकर) (सरकारी प्रकाशन)
संत नामदेव (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
संत नामदेव चरित्र (बालवाङ्‌मय, शैलजा वसेकर)
संत नामदेवांचे कवित्व आणि संतत्व (डॉ. श्रीपाल सबनीस)
संत शिरोमणी बाबा नामदेव (दीपक बिचे)

नामदेवांची स्मारके

* महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी म्हणतात.
*पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
*पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
*पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
*हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.





संत एकनाथ


                                संत एकनाथ

                  


  जन्म तारीख इ.स. १५३३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान)महाराष्ट्र 
मृत्यू तारीखइ.स. १५९९

   जीवन
                सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.
                एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
              कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची अरती घणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
                   फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

गुरुपरंपरा
*एकनाथांची गुरुपरंपरा :
*नारायण (विष्णू)
*ब्रह्मदेव
*अत्री ऋषी
*दत्तात्रेय
*जनार्दनस्वामी
*एकनाथ

एकनाथांचे कार्य व लेखन
*अनुभवानंद
*आनंदलहरी
*एकनाथी अभंग गाथा
*चिरंजीवपद
*एकनाथी भागवत : भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
चतु:श्लोकी भागवत मुद्राविलास
*भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
*भावार्थ रामायण : (एकनाथी ओवीबद्ध मराठी, रॉयल ऑक्टेव्ह साईज - निर्णयसागर शताब्दि प्रकाशन. (मूळ - *एकनाथ महाराज/संपादक - शं.भा. देवस्थळी, कृ.वि. सोमण)
*रुक्मिणीस्वयंवर
*लघुगीता
*शुकाष्टक टीका
*समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.
*स्वात्मबोध
*संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ - एकूण २५ अभंग
*हस्तमालक टीका
*ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या *शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.

एकनाथांवरील मराठी पुस्तके
*संत एकनाथ (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
*संत एकनाथ (विजय यंगलवार)
*संत एकनाथ (विनायक मुरकुटे)
*श्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर)
*संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)
*एकनाथ गाथा (संपादक - साखरे महाराज (नानामाहाराज साखरे))
*एकनाथ चरित्र (ल.रा. पांगारकर)
*संत एकनाथ दर्शन (ललित लेखसंग्रह, लेखक -हे.वि. इनामदार)
*संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
*एकनाथांची निवडक भारुडे (डॉ. वसंत जोशी)
*एकनाथी भागवत सार्थ (सदाशिव आठवले)
*एकनाथी भागवत (शोधून, विपुल व सुबोध टीपा आणि अल्पचरित्र यांसह लिहिलेला ग्रंथ, लेखक/संपादक गोविंद नारायण शास्त्री दातार)
*एकनाथी भागवताचा अभ्यास (दा.वि. कुलकर्णी)
*एका जनार्दनी (एकनाथांवरील दीर्घ कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे)
*एका जनार्दनी (डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. वि.रा. करंदीकर
*एका जनार्दनी ! (कादंबरी, लेखक - रवींद्र भट
*एका जनार्दनी (बालसाहित्य, लेखिका - लीला गोळे)
*एकोबा (एकनाथांचे चरित्र, लेखिला - डॉ. कुमुद गोसावी)
*भागवतोत्तम संत एकनाथ (डाॅ. शं. दा. पेंडसे)
*लोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)





संत ज्ञानेश्वर


                          संत ज्ञानेश्वर



 (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; मृत्यू/समाधी : आळंदी, इ.स. १२९६)
ज्ञानेश्वर मूळ नाव : ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
समाधी मंदिर:  आळंदी संप्रदायनाथ
संप्रदाय : वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरू : निवृत्तिनाथ
साहित्य रचना : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग भक्ति कविता
वडील : विठ्ठलपंत कुलकर्णी
आई : रुक्मिणीबाई
ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठल सुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानेश्वर
हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत  आणि  कवी.  भागवत   संप्रदायाचे प्रवर्तक,  योगी व  तत्त्वज्ञ होते.  भावार्थदीपिका  (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.

ज्ञानेश्वरांचे बालपण
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
     आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठणजवळ  गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. 
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली.
भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
     

ज्ञानेश्वरांचे कार्य
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.
निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.रेरे
चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
        

संजीवन समाधी

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
*अमृतानुभव
*चागदेव पासष्टी
*भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
*स्फुटकाव्ये (अभंग, विराण्याआदि.)
*हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)
*ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरांवरील आणि ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवरील पुस्तके
*अमृतानुभव (रा.ब. रानडे)
*अमृतानुभव (पंडित सातवळेकर)
*अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
*अमृताचा अनुभव : ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद (हेमंत राजाराम)
*आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
*संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
*संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - (विंदा करंदीकर)
*अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
*The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
*इंद्रायणीकाठी (कादंबरी, रवींद्र भट)
*गीतादर्शन : श्री ज्ञानेश्वर आणि श्री रमण महर्षी (डॉ. सुधाकर नायगावकर)
The Genius of Dnyaneshvar (रविन थत्ते)
*ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
*दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
*नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर (डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
*ज्ञानदेवांचे पसायदान (अरविंद मंगरूळकर, व विनायक मोरेश्वर केळकर)
*भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.शं.वा. दांडेकर)
*महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं.दा. पेंडसे)
*माऊलीचा सार्थ हरिपाठ (वामन देशपांडे)
*माणूस नावाचे जगणे (रविन लक्ष्मण थत्ते)
*मी हिंदू झालो (रविन थत्ते)
*मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
*येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - *प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
*विश्व माऊली ज्ञानेश्वर (डॉ. शैलजा काळे)
*श्रीज्ञानेश्वर - अलौकिक व्यक्तिमत्त्व (कोंकणी, हरदत्त खांडेपारकर)
*संजीवन (ज्ञानेश्वरांच्या भावविश्वावरील कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
*संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
*संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
*संत ज्ञानेश्वर महाराज (चरित्र, बालवाङ्मय, लेखक - अरुण गोखले)
*संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
*सार्थ श्री ज्ञानेश्वरी (श्री गुरु साखरे सांप्रदायिक शुद्ध) (संपादक - विनायक नारायण जोशी आणि रामचंद्र तुकाराम यादव; अक्षर दालन प्रकाशन)
*सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास)
*ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
*श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
*श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ, प्रा. के.वि. बेलसरे)
*ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
*ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
*श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
*ज्ञानराज माउली (लीला गोळे)
(वि)ज्ञानेश्वरी (रविन थत्ते, मृणालिनी चितळे)
*ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी (विनोबा भावे)
*ज्ञानदेवांची वाणी (डॉ. अशोक देशमाने, डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
*ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
*श्रीज्ञानेश्वर चरित्र (ल.रा. पांगारकर)
*श्रीज्ञानेश्वर : तत्त्वज्ञ, संत आणि कवी (व्याख्यानसंग्रह, *व्याख्याते लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - ढवळे प्रकाशन
*ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. श्रीपाल सबनीस)

Wednesday, June 17, 2020

ई बालभारती

1ली ते 12 वी पर्यंतची पाठ्यपुस्तके pdf मध्ये डाउनलोड करा. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Sunday, June 14, 2020

कोकण किनारा

◆  कोकण किनारा ◆
________________________

★ उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.

★ अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी

★ कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी

★ कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९

★ रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल

★ नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा

★ कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड

★ महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई

★ राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)

★ राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा

★  कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय

★ कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड)

★  कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा

★ कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.
________________________

Friday, June 12, 2020

पश्चिम घाट (सह्याद्री)

पश्चिम घाट (सह्याद्री) –
_________________________
◆. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.
_______________________
◆ सह्याद्रीच्या उपरांगा ◆
_______________________

◆ गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग –सातमाळ डोंगर

◆. सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर

◆. पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग – हरिश्चंद्र बालाघाट

◆शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठार
________________________
◆ महाराष्ट्रातील शिखरे ◆
________________________

★  कळसूबाई -१६४६  - नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)

★ साल्हेर - १५६७ - नाशिक व महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे

★ महाबळेश्वर -१४३८ -  सातारा

★ हरिश्चंद्र गड -१४२४  -अहमदनगर

★ सप्तश्रृंगी गड -  १४१६ - नाशिक

★ त्रंबकेश्वर -  १३०४ - नाशिक
_______________________

घाट (खिंड)

◆ घाट (खिंड) ◆
___________________________

◆ उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घाट म्हणतात.
___________________


★   सह्याद्रीतील प्रमुख घाट ★
___________________

◆ थळघाट (कसारा)=  ७  = नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)

◆ बोरघाट =  १५ = पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)

◆ आंबाघाट = ११ = रत्नागिरी-कोल्हापूर

◆ फोंडाघाट  = ९ =  कोल्हापूर-गोवा

◆ आंबोली (रामघाट) =  १२ = सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव

◆ खंबाटकी (खंडाळा) = पुणे-सातारा -बंगलोर

◆ कुंभार्ली घाट = चिपळूण (रत्नागिरी)-कराड

◆ वरंधा घाट  = ६ =  भोर-महाड

◆ दिवा घाट =  पुणे-सासवड मार्गे बारामती

◆ माळ्शेज घाट  = आळेफाटा (पुणे)-कल्याण

◆ नाणेघाट = १२ =  अहमदनगर - मुंबई

◆ पारघाट  = १०  = सातारा-रत्नागिरी

◆ रणतोंडी घाट =  महाड-महाबळेश्वर

◆ पसरणी घाट  = वाई-महाबळेश्वर

◆ चंदनपूरी घाट  =  नाशिक-पुणे

◆ आंबेनळी =  महाबळेश्वर-पोलादपूर

◆ ताम्हणी = रायगड-पुणे
__________________________

लोकमान्य टिळक


               *लोकमान्य टिळक *
    

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
जन्म: जुलै २३,इ.स. १८५६
रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू: ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन:केसरी मराठा
पुरस्कार:लोकमान्य,
भारतीय असंतोषाचे जनक .
प्रमुख स्मारके:मुंबई दिल्ली इ
धर्म:हिंदू
प्रभाव:शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित:महात्मा गांधी, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर
वडील:गंगाधर रामचंद्र टिळक
आई:पार्वतीबाई टिळक
पत्नी:सत्यभामाबाई
अपत्ये:श्रीधर बळवंत टिळक
तळटिपा:
"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "
आज 1 ऑगस्ट 2018, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी . ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते.
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक.   त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले.टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
एकदा शाळेत असताना, वर्गात मुलांनी शेंगांची टरफले टाकली. गुरुजी वर्गात आल्या नंतर त्यांनी हे पाहिले आणि टिळकांना विचारले, हि टरफले कोणी टाकली ते सांग. त्यावर टिळक म्हणाले, मी चहाडी करणार नाही. गुरुजींनी शिक्षा म्हणून त्यांना ती टरफले उचलण्यास सांगितली. त्यावर टिळक उत्तरले मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. एकदा वर्गात गुरुजींनी संत हा शब्द लिहावयास सांगितला. टिळकांनी तो शब्द तीन प्रकारे लिहिला संत, सन्त, सनत. गुरुजींनी त्यातला पहिला शब्द बरोबर देऊन बाकीचे दोन चूक दिले. त्यावर टिळकांनी गुरुजींनासर्व शब्द कसे बरोबर आहेत ते सांगितले.
टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले.पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली.
असं हे बहुमूल्य रत्न, मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना माझे शतशः प्रणाम. जय हिंद ! जय महाराष्ट्र !


भगतसिंग


  *भगतसिंग*


भगत सिंग (पंजाबी उच्चारण: [pəɡət sɪŋɡ] 28 सप्टेंबर 1907 – 23 मार्च 1931) एक भारतीय क्रांतिकारी समाजवादी नेता होते, ज्यांच्या ब्रिटिश विरुद्धच्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे  वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना गळफासाची शिक्शा देण्यात आली, व भारतीय स्वतंत्र्य चळवळी मध्ये त्यांचे  नाव प्रसिद्ध झाले.
भगतसिंग
*टोपणनाव*: भागनवाला
*जन्म*: सप्टेंबर 28, १९०७
ल्यालपूर, पंजाब, भारत
*मृत्यू*: मार्च २३, १९३१
लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत
*चळवळ*:भारतीय  स्वातंत्र्यलढा
*संघटना*: नौजवान भारत सभा,
कीर्ती किसान पार्टी,
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
*पत्रकारिता/ लेखन*: अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम'
*धर्म*: नास्तिक
*प्रभाव*: समाजवाद, कम्युनिस्ट
*वडील*: सरदार किशनसिंग संधू
*आई*:विद्यावती
डिसेंबर १९२८ मध्ये, भगत सिंग आणि एक सहकारी, शिवराम राजगुरू, ह्यांने प्राणघातकपणे 21 वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी, जॉन साँडर्सला, लाहोर, ब्रिटिश भारत, येथे गोळ्या घालुन ठार पाडले. ब्रिटिश पोलीस अधीक्षक, जेम्स स्कॉट, ह्यांना ठार मारण्याचा हेतू  असुन, तयांने चुकुन सांडर्सला मारले. लोकप्रिय भारतीय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय, ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश स्कॉट ने दिला असुन, त्यामध्ये ते जखमी झाले, आणि, दोन आठवडे झाल्यानंतर एक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. त्यांच्या मौतीचा बदला म्हणून त्यांनी स्कॉटला मारण्याचा निर्णय घेतला. चंद्रशेखर आझाद ह्यांने चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलिस अधिकारीला, तो सिंग व राजगुरुचा शोध घेत असतांना मारले.
*सुरुवातीचे जीवन*
भगतसिंगचा जन्म एका संधु सिख जाट घराण्यात १९०७ साली पंजाब भागातील लयालपुर जिल्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडीलांचे नाव किशन सिंग होते. त्याचा जन्म त्याच वेळेस झाला जेव्हा त्याच्या वडिलांना व दोन काकांना तुरुंगातुन सुटका झाली. त्याच्या परिवारातील काही सदस्य भारतीय स्वतंत्र्य आंदोलनात सामील झाले होते, तर काही माहाराजा रंजीतसिंगच्या सैन्यात होते.
त्याचा परिवार हा राजकीय कार्यांमध्ये सक्रिय होता. त्याचे आजोबा अर्जुन सिंग हे स्वामी दयानंद सरस्वतीच्या हिंदु सुधारणावादी चळवळ, आर्य समाज, ह्यामध्ये सामील होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या घदर पार्टीचे सदस्य होते.
त्याच्या वयाच्या ईतर सिख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हाय स्कूल येथे गेला नाही. त्याचा आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटीश सरकार बद्दलची निष्ठा मंजूर नव्हती.
बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाघ हत्याकांडाच्या थोड्याच वेळाने त्याने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्या विरुद्धच्या आंदोलनात तो सामील झाला. गांधीजींने असहकार चळवळ बंद केल्यानंतर सिंग हा गांधींच्या अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला.
ईटालीच्या गायुसेप माझ्झिनीच्या 'यंग ईटाली' नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन सिंगने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापित केली. तो हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचा सदस्य झाला, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी तो घर सोडुन कानपुरला निघुन गेला. एका पत्रात त्याने लिहीले 'माझ जिवन हे सर्वोत्क्रुष्ट कामासाठी मी समर्पीत केलय, जे की देशाचे स्वतंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही'.
*भगतसिंगांचे वाचन*
भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे१८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशनाआधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकरलिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.
*वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते*
भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.
*स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य*
९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.
खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत् हॊय.
*आरोपपत्र*
"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोरआणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्‍न केला :-
१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बाँब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणार्‍या पोलिस वा इतर अधिकार्‍यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्र्‍या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणार्‍या लोकांचे वध करणे.
४) आगगाड्या उडविणे.
५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.
६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.
७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,
८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणार्‍या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.
*भगतसिंगांचे विचार* *नक्की वाचा*
बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्‍न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्‍न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.
हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत *जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरो के कांद्हो पार तो सिर्फ जनाजे उठाये जाते ही*
*'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,*
*सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'*
*शहीद भगतसिंग आणि गांधीजी*
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .
महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फ़ाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."[१]
भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.[२]
*नास्तिकत्व*
ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे शहीद भगतसिंग हे नास्तिक नसल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या संग्रहालयात आयोजित एका प्रदर्शनात करण्यात आला आहे. कम्युनिझमवर निष्ठा असणारे भगतसिंह आस्तिक असल्याचे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भगतसिंग हे नास्तिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. लाहोरच्या तुरुंगात असताना भगतसिंग यांनी या गीतेचे अध्ययन केले होते. नास्तिक माणसाला जगातील कुठल्याही धार्मिक पु्स्तकाचा अभयास करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय भगवद्गीता हे धार्मिक पुस्तक नाही.
संग्रहालयाचे क्युरेटर नरुल हुड्डा यांनी हा दावा केला असून, २७ सप्टेंबर २००८ ते ३१ मार्च २००९ पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित अनेक ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. यातच ८ एप्रिल १९२९मध्ये त्यांनी सेंट्रल असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बच्या अवशेषांसह एक गीताही ठेवण्यात आली आहे.
या गीतेवर भगतसिंग सेंट्रल तुरुंगात लाहोर असे लिहिण्यात आले आहे. परंतु भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी मात्र ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.
शहीद भगतसिंगांचा "मी नास्तिक का झालो" हा निबंध प्रसिद्ध आहे. त्यामुळे भगतसिंग नास्तिकच होते यांत शंका नाही.
या निबंधामुळे भगतसिंग आहे कि नाही हा वाद बंद झाला .
*'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग (वय २३ वर्षे)*
*"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.*
*'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?*
*एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदूआपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.*
*जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.*
*संग्रहालय*
अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलाँ येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.
*दफनभूमीवरील स्मारक*
भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
*पुस्तके*
भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही निवडक पुस्तके :-
भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर) (मराठी अनुवाद - शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास - भगवान दातार)शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक - दत्ता देसाई)सरदार भगतसिंग (संजय नहार)मी नास्तिक आहे का ?
*कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकाची कहाणी*
जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे जिंदा आणि सुखा या दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना एक पत्र पाठवून ‘आम्ही भगतसिंग यांच्यासारखेच क्रांतिकारक आहोत’ असा दावा केला होता. नय्यर यांनी भगतसिंग यांच्याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्या लेखाची प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नय्यर साहजिकच अस्वस्थ झाले. ‘भगतसिंग यांचा लढा आणि त्यांचे आयुष्य लोकांसमोर नेमकेपणाने मांडलेच पाहिजे अन्यथा अनेक दहशतवादी आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतील,’ या विचाराने भगतसिंग यांचे चरित्र लिहिण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला.
भगतसिंग यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करून हे चरित्र लिहिण्याचा नय्यर यांचा प्रयत्‍न होता. त्यासाठी ते पाकिस्तानात गेले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू या तीन क्रांतिकारकांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना जिथे फाशी देण्यात आली होती, त्या ठिकाणांना नय्यर यांनी भेट दिली. या क्रांतिकारकांची स्मृती सांगणारे आता तिथे काहीही नाही. १९३१ मध्ये २३ मार्च या दिवशी या तिघांना फाशी दिली गेली. त्यांची समग्र माहिती देता यावी, यासाठी नय्यर यांनी त्यांच्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहारही केला होता; पण त्यांना ती कागदपत्रे मिळाली नाहीत. लंडनमधल्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’मध्ये यासंबंधीची काही कागदपत्रे होती; पण तीदेखील नय्यर यांना मिळू शकली नाहीत. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी आपली भूमिका आणि आपला लढा स्पष्ट करणारी चार पुस्तके लिहिली होती. या पुस्तकांची हस्तलिखिते मिळवण्याचा नय्यर यांनी प्रयत्‍न केला. मात्र, तो प्रयत्‍नही निष्फळ ठरला.
नय्यर यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या भावांशी त्यांनी संपर्क साधून माहिती मिळवली. हे करताना धक्कादायक माहिती पुढे येत गेली. सुखदेव यांच्या भावाला पंजाब पोलिसांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. जवळजवळ सात वर्षं नय्यर यांनी या पुस्तकासाठी काम केले. अनेकांच्या भेटी घेऊन, विविध ठिकाणच्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘विदाउट फिअर : लाइफ ॲन्ड ट्रायल ऑफ भगतसिंग’ या शीर्षकाने इंग्लिशमध्ये आलेल्या या पुस्तकाचा भगवान दातार यांनी केलेला अनुवाद ‘शहीद’ या शीर्षकाने रोहन प्रकाशनातर्फे भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने, २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झाला.

Wednesday, June 10, 2020

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी पडली

*🧐तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं जाणून घ्या👇*


 
        आपण पाहतो, आपल्या घरात, आजूबाजूला राहत असलेल्या अनेकांचं कोणतं ना कोणतं टोपननाव असतचं. अनेकांना पाळण्यातील नाव हे तर असतातच. तसेच घरात आवडीने आणि वेगवेगळ्या नावाने बोलण्यासाठी अनेकांना टोपणनावे ठेवली जातात. त्याचपध्दतीने भक्कम ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावालाही इतिहास आहे. त्यानंतर काही शहरांच्या नावात बदल करण्यात आले आहे.

        महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची जुनी नावं बऱ्याच जणांना माहित नसतील. अशावेळी आपण बराच विचार करत असतो की, जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले. त्या मागचा इतिहास काय असेल. कशावरुन हे नाव ठेवण्यात आले असेल.असे एक ना अनेक प्रश्‍न आपल्याला भेडसावत असतात. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्ह्यांची नाव काळानुसार बदलत गेली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्या त्या शहरांचा नावांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी ठरली असतील ते जरुर वाचा.

 *💁‍♂️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे*

 *अमरावती*
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी ओळख असलेला अमरावती जिल्हा. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याचे मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे करण्यात आले.

 *औरंगाबाद*
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे. आजच्या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी होते. तसेच अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या मुघल सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.

 *बीड*
महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव पडले आहे.

 *भंडारा*
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.

 *बुलडाणा*
बुलडाणा जिल्हा हा अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ओळखले जात होते. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे मुक्कामाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.

 *चंद्रपूर*
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.

 *धुळे*
महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्‍चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.

 *गोंदिया*
महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.

 *हिंगोली*
महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.

 *जळगाव*
महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.

 *जालना*
महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.

 *कोल्हापूर*
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.

 *लातूर*
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.

 *मुंबई*
महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.

 *नागपूर*
महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.

 *नंदुरबार*
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.

 *नाशिक*
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.

 *उस्मानाबाद*
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.

 *परभणी*
महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.

 *पुणे*
महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.

 *रायगड*
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.

 *सांगली*
महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.

 *सातारा*
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.

 *सिंधुदुर्ग*
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.

 *सोलापूर*
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्‍वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.

 *ठाणे*
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.

 *वर्धा*
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.

 *वाशिम*
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.

 *यवतमाळ*
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.

 *अकोला*
महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.
*बीड*
चंपावतीनगर राणी चंपावती च्या नावावरून पडले नंतर येथे अगोदर पाणी परपूर असल्याने उर्दू भीर  नाव पडले
नंतर गर्दी झाल्यामुळे भीड म्हणू लागले व इंग्रज आल्यावर bheed मधील h अपभ्रंश झाला व बीड हे नाव पडले

Sunday, June 7, 2020

राणी लक्ष्मीबाई

        _*■राणी लक्ष्मीबाई■*_
═══════🦋🦋═══════

राणी लक्ष्मीबाई नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १८, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
═══════════════════
_*★महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर★*_

_*★टोपणनाव:-*_ मनू

_*★जन्म:-*_ नोव्हेंबर १९, इ.स. १८३५ काशी, भारत

_*★मृत्यू:-*_ जून १८, इ.स. १८५८ झाशी, मध्य प्रदेश

_*★चळवळ:-*_ १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

_*★वडील:-*_ मोरोपंत तांबे

_*★आई:-*_ भागीरथीबाई तांबे

_*★पती:-*_ गंगाधरराव नेवाळकर

_*★अपत्ये:-*_ दामोदर (दत्तकपुत्र)
═══════════════════
           _*◆बालपण◆*_

लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.
═══════════════════
           _*◆व्यक्तिमत्त्व◆*_

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
═══════════════════
       _*◆वैवाहिक जीवन◆*_

इ.स. १८४२मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.
═══════════════════

_*◆झाशी संस्थान खालसा◆*_

पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४  रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.
═══════════════════
_*◆इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध◆*_

इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्याया ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
═══════════════════
          _*◆विशेष◆*_

ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. ``रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।। ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशिवाली।।

खुब लढी मर्दानी वो तो झांशी वाली रानी थी। ..कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान
◆•═════•ஜ۩۞۩ஜ•═════•◆

_*राणी लक्ष्मीबाईच्या नावाचे पुरस्कार*_

● उत्तर प्रदेश सरकारचा रानी लक्ष्मीबाई पुरस्कार (कुस्तीविद्येत प्रवीण असलेल्या साक्षी मलिक यांना हा पुरस्कार मिळाला आहे.)

● भारत सरकारचा राणी लक्ष्मीबाई स्त्री-शक्ती पुरस्कार

● मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला ’वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या बच्छेंद्री पाल यांना हा पुरस्कार मिळाला होता.(इ.स. २०१३)                             ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
         
   

खुदीराम बोस

 *❒ ♦खुदीराम बोस♦ ❒* 
     

●जन्म :~ ३ डिसेंबर १८८९
*●स्मृतिदिन :~ ११ ऑगष्ट १९०५*
 ◆ खुदीराम बोस ◆
      भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

     बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली. यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.
     घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला ११ ऑगस्ट १९०५
या दिवशी फासावर जावे लागले.

     *सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
     

उमाजी नाईक

*❒ ♦उमाजी नाईक♦ ❒* 
    

*●जन्म :~ ७ सप्टेंबर १७९१*
      पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे
●मृत्यू :~ ३ फेब्रुवारी १८३२

 *एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक...*
         *★ उमाजी नाईक ★*
     हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.

    🔹हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद  झाली, काही तशाच राहून गेल्या. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व  सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा  महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

   ♦आद्याक्रांतीकाराबद्दल....
*"मरावे परि क्रांतीरूपे उरावे"*
अशी उक्ती आहे. ती आद्याक्रांतीकारक उमाजी  नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले  आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले  नाहीत. इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना  म्हंटले आहे, उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो  कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी  सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही ?
तर टोस म्हणतो, उमाजीपुढे  छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. *त्याला फाशी दिली  नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.*

   🔸हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे...!! जर इंग्रजांनी कुटनीती  आखली नसती  तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
   🔹नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई  व दादोजी  खोमणे यांच्या पोटी  ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे  झाला. उमाजीचे  सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी  पार  पाडत  होते. त्यामुळेच त्यांना नाईक हि पदवी मिळाली. उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट, उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुर्हाडी, तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता  स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात  घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले. आणि  त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व  किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू  घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची  वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी  बेभान  झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत  माझ्या देशावर  परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी  नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत  जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात  पहिल्या बंडाची गर्जना केली.
      🔸इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना  लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत  करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो  भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक  वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने  त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या  कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी   लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ  लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
     🔹उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या  मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या  पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्रज  सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच  धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते.
   🔸१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या  देखभालीसाठी जनतेला वाटला होता.

    🔹१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या  सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि  इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना  शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार  आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार  त्यांना शासन  करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला  होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.

   🔹१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना  उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.
    🔸या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत  वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत  फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या  बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर  इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
    🔹अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल  १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव  बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८७९ साली इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले.. त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.
अशा या आद्याक्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक यांचा आपण विसर न पाडता त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस त्रिवार अभिवादन करूयात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••