📙 *आपल्या शरीरात एकूण किती जनुकं आहेत ?* 📙
*******************************
आपल्या यच्चयावत अनुवांशिक गुणधर्मांचा आराखडा डीएनए या रसायनाच्या रेणूंमध्ये सांकेतिक रूपात साठवलेला असतो. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात असलेल्या डीएनएमध्ये ही माहिती साठवलेली असते. या डीएनएची रचना दुहेरी गोफासारखी किंवा गोल गोल जिन्यांसारखी असते. या जिन्याच्या पायऱ्या समोरासमोरच्या कठड्यांना जोडलेल्या नायट्रोजनयुक्त घटक रेणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक पायरी ही समोरासमोरच्या दोन रेणूंच्या जोडगोळीची बनलेली असते. या घटक रेणूंच्या अनुक्रमाक अनुवांशिक गुणधर्मांची माहिती साठवलेली असते. या माहितीचा एकक म्हणजे एक जनुक.
आपल्या शरीरातल्या डीएनएमध्ये एकूण तीन अब्ज पायऱ्या म्हणजेच नायट्रोजनयुक्त घटक असतात. तीन पायऱ्या मिळून जो एक कोडाॅन होतो तो प्रथिनांच्या साखळीतील एका घटकाविषयीचा आराखडा सांकेतिक रूपात आपल्यात दडवून ठेवतो. याचा अर्थ झाला की असे किमान एक अब्ज कोडाॅनं आपल्या शरीरात असतात. जनुकं अशा काही कोडाॅनची बनलेली असतात. काही जनुकं थोड्याच कोडाॅनची असतात, तर काहींची लांबी त्याच्या कितीतरी पट असते. त्यामुळे शरीरात एकूण नक्की किती कोडाॅन आहेत याची माहिती नव्हती; पण एकूण कोडाॅनच्या संख्येवरून किमान एक लाख तरी जनुकं शरीरात असावीत, असा अंदाज केला गेला होता. मानवाच्या यच्चयावत जनुकसंचयाचं वाचन करण्याचा 'ह्युमन जीनोम' हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यापूर्वी मूषक वगैरेसारख्या काही प्राण्यांच्या जीनोमचं वाचन करण्यात आलं होतं. त्यातून त्या प्राण्यांच्या शरीरातल्या एकूण जनुकांच्या संख्येची माहिती मिळाली होती. त्यावरूनही हा अंदाज योग्य वाटत होता.
पण प्रत्यक्षात जेव्हा मानवी जनुकसंचयाचं वाचन सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसा वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं दिसून आलं. आजमितीला अशी चाळीस हजार जनुक असावीत असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या बहुतेक वैज्ञानिकांचे मत आहे. ते सर्व मान्य आहे असं नाही. कारण ऐकून डीएनएपैकी कितीतरी भाग कोणत्याच प्रथिनाच्या उत्पादनात सहभागी नसल्याचं दिसून आलं आहे. याला जंक डीएनए किंवा इन्ट्राॅन असं म्हणतात. प्रथिनांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या डीएनएला एक्झॉन असे म्हणतात. या दोन्हींची एकमेकांमध्ये गुंफण झालेली आहे. म्हणजे दोन एक्झॉनच्यामध्ये काही इन्ट्राॅन आहेत. तसंच एका जनुकामध्ये एकाहून अधिक एक्झॉन असतात आणि ते काही इन्ट्राॅनमुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात, हेही दिसून आलं आहे. म्हणूनच काही वैज्ञानिक या ४० हजारांच्या आकड्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मते खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक असावी; आणि ७० ते ८० हजार जनुकं शरीरात असावीत, असा त्यांचा दावा आहे. जसजशी हय़ुमन जिनोमची अधिक तपशीलवार माहिती हाती येत आहे तसतसा यापैकी कोणता दावा खरा आहे यावर अधिक प्रकाश पडणार आहे.