manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Thursday, July 16, 2020

सूर्यमालेतील ग्रह

🌷🌷सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती🌷🌷


▪️1. ग्रहाचे नाव - बूध

·         सूर्यापासुन चे अंतर - 5.79 

·         परिवलन काळ - 59

·         परिभ्रमन काळ - 88 दिवस

·         इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

▪️2. ग्रहाचे नाव - शुक्र

·         सूर्यापासुन चे अंतर - 10.82 

·         परिवलन काळ - 243 दिवस

·         परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

▪️3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

·         सूर्यापासुन चे अंतर - 14.96 

·         परिवलन काळ - 23.56 तास

·         परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

·         इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

▪️4. ग्रहाचे नाव - मंगळ

·         सूर्यापासुन चे अंतर - 22.9 

·         परिवलन काळ - 24.37 तास

·         परिभ्रमन काळ - 687

·         इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


▪️5. ग्रहाचे नाव - गुरु

·         सूर्यापासुन चे अंतर - 77.86

·         परिवलन काळ - 9.50 तास

·         परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.



▪️6. ग्रहाचे नाव - शनि

·         सूर्यापासुन चे अंतर - 142.6

·         परिवलन काळ - 10.14 तास

·         परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

▪️7. ग्रहाचे नाव - युरेनस 

·         सूर्यापासुन चे अंतर - 268.8 

·         परिवलन काळ - 16.10 तास

·         परिभ्रमन काळ - 84 वर्षे

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

▪️8. ग्रहाचे नाव - नेपच्यून 

·         सूर्यापासुन चे अंतर - 449.8

·         परिवलन काळ - 16 तास

·         परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.