📒 *नार्को टेस्ट काय सांगते ?*📒
*******************************
एखाद्या व्यक्तीची चौकशी चालू असताना ती व्यक्ती जर खरे सांगत नाही काही गोष्टी लपवून ठेवते आहे किंवा दिशाभूल करण्यासाठी चक्क खोट्याचा आश्रय घेत आहे असं वाटल्यास त्याच्याकडून खरं काय ते वदवून घेण्यासाठी नार्को टेस्टचा वापर केला जातो. विशेष करून अट्टल गुन्हेगारांकडून खरी माहिती मिळवण्यासाठी चौकशी अधिकारी या प्रकारच्या चाचण्यांचा वापर करतात. अशा प्रकारच्या किमान तीन वेगवेगळ्या चाचण्या आज उपलब्ध आहेत.
पहिली आहे पॉलिग्राफ टेस्ट. या परीक्षेत संबंधित व्यक्तीच्या अंगाला वेगवेगळ्या ठिकाणी काही इलेक्ट्रोड्स लावून त्याच्या शरीरक्रियेतील निरनिराळ्या प्रक्रियांपोटी उमटणाऱ्या विद्युतस्पंदांची नोंद केली जाते. यापाठचे तत्त्व असे आहे कि कोण जेव्हा कोणीही खोटे बोलत असतो त्यावेळी त्याने कितीही बेफिकीरी दाखवली तरी त्याचे अंतर त्याला खात असते. त्यामुळे तो कसल्यातरी दबावाखाली वावरल्यासारखे वागत असतो. त्या दबावापोटी त्याच्या काही शरीरक्रियांमध्ये बदल होतात. यांचीच नोंद माग त्या इलेक्ट्रोडद्वारे घेतली जाते. त्यासाठी त्याला निरनिराळे प्रश्न विचारले जातात. काहींची उत्तरे विचारणाऱ्याला माहित असतात. शिवाय त्या त्यांच्या बाबतीत काहीही खोटे सांगण्याचे प्रयोजन नसते. उलट काही प्रश्न खुबीने विचारले जातात. त्या वेळी जर ती व्यक्ती खोटे सांगत असेल तर त्याच्या शरीरक्रियेत बदल होतात. आणि तेच नेमके टिपले जाऊन तो केव्हा खोटे बोलत आहे याचा वेध घेता येतो.
दुसऱ्या प्रकारच्या चाचणी त्या व्यक्तीला सोडियम पेन्टाथाॅल या रसायनाचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीची हिप्नाॅटाईज केल्यासारखी अवस्था होते. त्याच्या मनावर असलेली सांस्कृतिक, सामाजिक बंधने कोसळून पडतात. तो मुक्तपणे बोलू लागतो. अशा परिस्थितीत तो खोटे बोलण्याची शक्यता कमी होते. कारण खोटं बोलण्यासाठी मनाची जी खास तयारी करावी लागते ती करणे अशक्य असते. अर्थात त्या रसायनाच्या अमलाखाली ती व्यक्ती स्वतःहून काही बोलू शकत नाही पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते तीच व्हिडिओ आणि आॅडिओ रेकॉर्डरमार्फत मुद्रित केली जातात.
१९९६ साली या चाचण्यांमध्ये आणखी एकाची भर पडली. त्याला ब्रेन मॅपिंग म्हणतात. यात प्रथम त्या व्यक्तीला प्रश्न विचारून त्याची चौकशी केली जाते. त्यातून तो काही माहिती दडपण्याचा प्रयत्न करत आहे की काय याविषयी अंदाज बांधण्यात येतात. त्यानंतर त्याच्या डोक्याला निरनिराळ्या ठिकाणी इलेक्ट्रोड लावून त्याच्या मेंदूचा पी - ३०० या नावाने ओळखल्या जाणाऱया विद्युतलहरींची नोंद करण्यात येते. त्यावेळी त्याला काहीही प्रश्न विचारले जात नाहीत. पण काही चित्रे दाखवली जातात किंवा आवाज ऐकवले जातात. जर त्याचा त्या चित्रांची वा आवाजाशी काही संबंध असेल तर पी-३०० तरंग उत्पन्न होतात. त्यावरून त्याच्या कथनाची सत्यासत्यता तपासण्यात येते. या तीन निरनिराळ्या टेस्टस असल्या तरी त्यांना उद्देशून 'नार्को टेस्ट' असेच म्हटले जाते.